Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : व्हीलचेअरवर कॉमेडिअन भारती सिंह

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : व्हीलचेअरवर कॉमेडिअन भारती सिंह

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कॉमेडिअन भारती सिंहचा आहे. भारतीचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारती सिंह एका व्हीलचेअरवर दिसत आहे. तिचा चेहरा देखील खूप कोमेजला आहे. या व्हिडिओत टीव्ही अभिनेता रित्विक धनजानी भारतीची व्हीलचेअर चालवण्यास मदत करत आहे.

भारती इतकी थकली आहे की इच्छा असून पण ती कॅमेऱ्याकडे बघून हसू शकत नाही. खूप कष्टाने ती सगळ्यांना आणि मीडियाला आपण ठीक असल्याचं सांगत आहे. भारती 'इंडियाज गॉट टॅलेंट' च्या प्रोमोचं शुटिंग करत आहे. खूप दिवसांपासून भारतीला लिगामेंटचा त्रास होत होता. दोन दिवसापूर्वीच भारतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तिची सर्जरी झाल्यामुळे तिला उभं राहण देखील शक्य नाही. तरी देखील ती आपलं शुटिंग पूर्ण करत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी 1 आठवडे भारती व्हीलचेअरवर राहणार आहे. भारतीला खतरों के खिलाडी च्या 9 व्या सिझनमध्ये दुखापत झाली. आणि तेव्हापासून तिला हा त्रास आहे. बहुदा ऑपरेशननंतर तिला आराम मिळेल. 

Read More