Marathi News> मनोरंजन
Advertisement

'विकी और विद्या की सुहागरात का व्हिडिओ गायब!' नेमकं काय आहे प्रकरण?

Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer: राजकुमार आणि तृप्ती डिमरीचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट आलिया भट्टच्या 'जिगरा'सोबत टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

'विकी और विद्या की सुहागरात का व्हिडिओ गायब!' नेमकं काय आहे प्रकरण?

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी असलेला 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'चा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये विकी आणि विद्याचा आनंदी प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. ते दोघे त्यांच्या कुटुंबासह ऋषिकेशच्या निसर्गरम्य ठिकाणी त्यांची हरवलेली "सुहागरातची सीडी" शोधण्यासाठी बाहेर पडतात. आपले कुटुंबिय आणि पोलिसांच्या मदतीने हे जोडपे सर्वत्र ती सीडी शोधण्याचा प्रयत्न करतात. ते दोघे आपली हरवलेली सीडी शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही मग ते सगळ्यांना आवाहन करणे असेल किंवा रात्री स्मशानात जाणे असेल. हा ट्रेलर साहस आणि हास्याने परीपूर्ण आहे.  

ट्रेलरची सुरुवात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी साकारत असलेल्या विकी आणि विद्या यांच्या लग्नापासून होते. हा काळ 1997 चा आहे. विकी म्हणतो की ब्रिटीश त्यांच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ बनवतात आणि मग तो आयुष्यभर बघतात. त्यामुळे त्यांचे प्रेम कधीच संपत नाही. विकी आणि विद्याही असेच करतात. पण त्यांचा हा व्हिडीओ असलेली सीडी आणि सीडी प्लेअर चोरीला जातो. आणि ते या चित्रपटात त्या चोराला शोधत असतात. अशी कथा या ट्रेलरमध्ये दाखवली आहे. 

 

याआधी गुरुवारी मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये एका रोमँटिक ड्रामाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राजकुमार राव, तृप्ती डिमरी, अर्चना पूरण सिंग, राकेश बेदी, मुकेश तिवारी, टिकू तलसानिया आणि मुबीन सौदागर आणि चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते.

राज शांडिल्यन हे या चित्रपटाचे दिग्दर्शिक असून ते सांगतात की, "90 च्या दशकातील 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट साहस आणि हास्याचे परिपूर्ण मिश्रण आहे. प्रेक्षकांसाठी हा नक्कीच मेजवानी ठरेल."

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी असलेला 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी आलिया भट्टचा 'जिगरा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' जिगराला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. 

राजकुमार रावच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता यानंतर आपल्याला 'मालिक' या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमारने आपल्या ४०व्या वाढदिवसानिमित्त म्हणजे ३१ ऑगस्टला आपल्या नवीन चित्रपटाचे नाव जाहिर केले होते. या 'मालिक' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या संबंधीत इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना राजकुमार रावने लिहिले आहे की, “मालिकच्या वर्ल्ड तुमचं स्वागत आहे. शूट सुरू झाले आहे, लवकरच आपली भेट होईल. 'मालिक' या चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित करत आहे. 

तर दुसरीकडे, तृप्ती डिमरी पुढे अभिनेता कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्यासोबत हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. 2024 च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

Read More