Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अजब प्रेम की गजब कहानी', विकी कतरिना लांब जाऊनही असे आले जवळ...

कतरिना कैफने  शेअर केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

'अजब प्रेम की गजब कहानी', विकी कतरिना लांब जाऊनही असे आले जवळ...

मुंबई : कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफचा वाढदिवस विकी कौशल आणि कतरिनाने साजरा केला. यावेळी अभिनेता सनी कौशल देखील उपस्थित होता. कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीजवर ग्रुप व्हिडिओ कॉलची एक झलक शेअर केली आहे.

स्क्रीनशॉट व्हायरल 
कतरिना कैफने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हॅपी बर्थडे इजाबेल कैफ. हे वर्ष तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. फोटोत, कतरिना, विकी, सनी, इसाबेल आणि आणखी मित्र व्हिडिओ कॉलवर वेगवेगळ्या ठिकाणांहून जॉईन झाल्याचं दिसत आहेत...

विकीने दिल्या शुभेच्छा 
विकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इसाबेलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने तिचा एक फोटो शेअर करत लिहिलं, 'तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आज पार्टीसाठी सर्वोत्तम वेळ आहे. त्याचबरोबर इसाबेलने रिप्लाय करत 'धन्यवाद' म्हटलं आहे.

fallbacks

एक महिन्यापूर्वी केलं लग्न 
डिसेंबरमध्ये, कतरिना आणि विकीने राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये विवाह केला. ज्यामध्ये 120 लोकं उपस्थित होते. सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.

Read More