Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. 

जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबईः ज्येष नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. वयाच्या  88व्या वर्षी त्यांची रात्री १० वाजता  प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी साडेबारा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे अशी माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता. त्यांना आपल्या वृत्तपक्षीय समीक्षेने अनेक कलाकृतींचं विश्लेषण केलं.

रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला होता. वयाची ऐंशी पार करूनही त्यांचं नाटय़वेड तसूभरही कमी झालेलं नव्हतं. आज रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गोरेगाव येथे ते वास्तव्य करत होते. उद्या तिथूनच ओशिवरा येथे  साडेबारा वाजेपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती त्यांच्या जवळच्या वक्तीकडून मिळाली आहे.

दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचं मुंबईत निधन झालं. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत अनेक नाटकांवर त्यांनी  लिखाण केलं आहे.  नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. 

Read More