Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raju Srivastav यांच्यावर कधी होणार अंत्यसंस्कार? मुळ गावाऐवजी 'या' ठिकाणाला प्राधान्य

त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना वेंन्टिलेटरवरही (Raju Srivastav on Ventilator) ठेवण्यात आलं होतं.

Raju Srivastav यांच्यावर कधी होणार अंत्यसंस्कार? मुळ गावाऐवजी 'या' ठिकाणाला प्राधान्य

Raju Srivastav Funeral : आपल्या विनोदशैली गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastav Death) यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना ताबडतोब दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (veteran comedian raju srivastav funeral will take place in delhi but not in his birthplace kanpur family confirms)

त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना वेंन्टिलेटरवरही (Raju Srivastav on Ventilator) ठेवण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या परंतु अखेर 21 सप्टेंबर रोजी त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली. 
राजू श्रीवास्तव यांच्यावर उद्या म्हणजे 22 सप्टेंबर (गुरूवार) रोजी दिल्ली येथे अंत्यसंस्कार (Raju Srivastav Funeral) केले जाणार आहेत.

परिवारानं दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर मुंबई, लखनऊ किंवा त्यांच्या मुळ गावी कानपूर अंत्यसंस्कार येथे होणार नसून दिल्ली येथे होणार आहे. राजू श्रीवास्तव यांचं मुळ गाव कानपूर येथे आहे. त्यांचा जन्म कानपूर या गावात झाला. राजू श्रीवास्तव यांच्या नातेवाईकांना दिल्ली येथे अंत्यसंस्कारांसाठी येणं जवळ पडेल या कारणानं राजू श्रीवास्तव यांच्या परिवारानं दिल्ली येथेच अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं आहे. 

42 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी - 
राजू यांना 10 ऑगस्टला ट्रेडमिलवर वॉक करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना ताबडतोब रूग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी (Raju Srivastav Angioplasty) करण्यात आली. ऑपरेशननंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते तसेच त्यांना वेंटिलेटरवर ठेण्यात आलं.

गेले अनेक दिवस त्यांना शुद्ध आली असल्याच्या बातम्या समोर येत होत्या सोबतच त्याचे ब्रेन डेड झाल्याचीही बातमी आली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेक चढउतार होत असताना अखेर आज सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यांच्या निधनानं टेलिव्हिजन व मनोरंजन क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. 

Read More