Marathi News> मनोरंजन
Advertisement

सेलिब्रिटी सूनेविषयी जया बच्चन यांचं लक्षवेधी वक्तव्य

एक व्हिडिओ होतोय व्हायरल 

सेलिब्रिटी सूनेविषयी जया बच्चन यांचं लक्षवेधी वक्तव्य

मुंबई : बच्चन कुटुंबाला हिंदी कलाविश्वात बरीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. अशा या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची वेगळी अशी ओळखही आहे. मुख्य म्हणजे कुटुंबात मतभेद असण्याच्या कितीही अफवा उठल्या तरीही त्याची पर्वा न करता आणि या अफवांना फेटाळून लावत बच्चन कुटुंबीयांनी कायमच त्यांच्यातील एकी दाखवून दिली आहे. याचंच उदाहरण पाहायला मिळत आहे ते म्हणजे सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये.

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातील हा व्हिडिओ पाहताना बच्चन यांच्या कुटुंबातील सदस्यांची एकमेकांशी असणारी सुरेख नाती समोर येत आहेत. या व्हिडिओमध्ये करण जोहर बिग बी अमिताभ बच्चन यांना एक प्रश्न विचारत आहे. सोबतच व्हिडिओ जसजसा पुढे जातो तेव्हाच, जया बच्चन या त्यांच्या सुनेविषयी म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबतच्या नात्याविषयी बोलताना दिसत आहे. 

ऐश्वर्या स्वत: एक सेलिब्रिटी असूनही कुटुंबात कशा प्रकारे सर्वांशी तिने एक वेगळं आणि खास नातं तयार केलं आहे, याविषयी त्या बोलत आहेत. 'एक सेलिब्रिटी  आणि यशस्वी अभिनेत्री असूनही ती या साऱ्यामध्ये (कुटुंबात) अगदी सुरेखपणे मिसळली आहे, असं त्या म्हणताना दिसतात. जया यांचे त्यांच्या सुनेविषयीचे उदगार पाहता सेलिब्रिटी सासू- सुनेचं हे नातं खऱ्या अर्थाने सर्वांचं मन जिंकत आहे. असं म्हणायला हरकत नाही. 

Read More