Marathi News> मनोरंजन
Advertisement

जया बच्चन यांनी अशी साजरी केली वसंत पंचमी....

वसंती पंचमी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते.

जया बच्चन यांनी अशी साजरी केली वसंत पंचमी....

नवी दिल्ली : वसंती पंचमी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात.

 जया बच्चन यांचे अनोखे सेलिब्रेशन

हा उत्सव बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीची खासदार जया बच्चन यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. या सणाची दिवशी जया बच्चन यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. या पार्टीत विद्या बालन, स्‍वरा भास्‍कर, कोंकणा सेन, मेहर विज, सीमा पावा, तिलोतमा शोम,  फिल्‍म 'लिपस्टिक अंडर माई बुर्का'च्या दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्‍तव यांसारख्या अनेक अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या.

विद्या बालनने शेअर केला फोटो...

विद्या बालनने एक फोटो शेअर केला आणि लिहीले की, सरस्वती पूजेच्या दिवशी आम्ही आमच्या आतील सरस्वती मातेचे पूजन केले... मला माहित आहे की सरस्वती मॉं सोशल मीडियावर नाही आहेत पण तुम्ही दिलेल्या अनोख्या आणि आठवणीत राहणाऱ्या क्षणांसाठी खूप धन्यवाद...

'सीक्रेट सुपरस्‍टार' मध्ये जायरा वसीमच्या आईची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री मेहर विज यांनीही फोटो शेअर करत एक किस्सा सांगितला. त्यांनी लिहिले की, मला वाटले विद्या बालनने विचारले की, तुम्हाला अवॉर्ड घेऊन कसे वाटते. मी सांगितले, मी विचारच करत नाही. माझा विश्वासच बसत नाही की, हे सगळे माझ्यासोबत होत आहे. यावर जया बच्चन म्हणाल्या, याचा विचारच करू नका आणि मी नेहमी असेच करेन.

 

Read More