Marathi News> मनोरंजन
Advertisement

न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरातचा आणखी एक बोल्ड फोटो, पुन्हा एकदा चर्चांना उधाण

बोल्ड आणि हॉट असा वनिताचा खास अंदाज 

न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरातचा आणखी एक बोल्ड फोटो, पुन्हा एकदा चर्चांना उधाण

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat Bold, Hot Photo) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वनिता खरात तिच्या न्यूड फोटोशुटमुळे (Vanita Kharat Nude Photoshoot)  चर्चेत आली होती. आता वनिताने आणखी एक बोल्ड आणि हॉट असा फोटो शेअर (Nude Photo) केला आहे. 

वनिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक बोल्ड आणि अगदी हॉट असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वनिताने डिप नेकचं जॅकेट घातलं आहे. त्यावर गळ्यात मोठी चेन घातली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या या फोटोतील तिचा लूक अतिशय कातिल आहे. तिच्या नजरा चाहत्यांना घायाळ करतील यात शंकाच नाही. (Vanita Kharat च्या 'त्या' बोल्डशूटनंतर असं बदललं आयुष्य? | Web Exclusive Interview |) 

वनिता खरातने दोन फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी तिच्य़ा या फोटोला हॉट अंदाज म्हणून कौतुक केलं आहे. तर काहींना असा फोटो टाकणं बरं नव्हे असं म्हणत या फोटोला नाकारलं.

या अगोदर 1 जानेवारी रोजी वनिता खरातने न्यूड फोटो शेअर केलेला. या फोटोमुळे ती खूप चर्चेत आली. अभिनेता शाहिद कपूरच्या 'कबिर सिंह'या सिनेमात वनिता खरातने 'पुष्पा' या मोलकरणीची भूमिका साकारली होती. पुष्पाचं हे पात्र अतिशय लोकप्रिय असून ते प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहे.

Read More