Marathi News> मनोरंजन
Advertisement

'काही लोक कॅमेऱ्यात चांगले दिसतात पण प्रत्यक्षात...', रणबीरसाठी अभिनेत्रीचं मोठं वक्यव्य

अनेक तरुणींचा क्रश असणार रणबीर नक्की आहे तरी कसा? अभिनेत्रीची प्रतिक्रिया  

'काही लोक कॅमेऱ्यात चांगले दिसतात पण प्रत्यक्षात...', रणबीरसाठी अभिनेत्रीचं मोठं वक्यव्य

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. रणबीर लवकरचं बाबा होणार असल्यामुळे एकीकडे अभिनेत्याला प्रत्येक जण शुभेच्छा देत आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्री वाणी कपूरच्या वक्तव्यामुळे रणबीर चर्चेत आला आहे. सध्या रणबीर आणि वाणी आगामी 'शमशेरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान वाणीने रणबीरसोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे. 

वाणी म्हणाली, 'रणबीर शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. प्रत्येक को-स्टारला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. स्टारडम मिळाल्यानंतर काही सेलिब्रिटींचा अंदाज पूर्णपणे बदलतो. पण रणबीर तसा नाही. तो इतरांपेक्षा वेगळा आणि नम्र आहे.'

'रणबीर कोणत्याही प्रकारचा देखावा करत नाही. माझी आणि रणबीरची मैत्री फार कमी कालावधीत झाली. तो स्क्रिनवर चमकत असतो, पण प्रत्येक्षात त्याचा वेगळा चार्म आहे. मला पुढे देखील रणबीरसोबत काम करायला आवडेल....'

रणबीरसोबत पहिल्या भेटीबद्दल वाणी म्हणाली...
'रणबीर आणि माझी पहिली भेट 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमा दरम्यान झाली. आम्ही राज स्टुडिओमध्ये होतो. पहिल्यांदा जेव्हा समोर आला, काही लोक कॅमेऱ्यात चांगले दिसतात पण प्रत्यक्षात असं नसतं...' तो खास आहे. असं देखील वाणी म्हणाली.

पुढे वाणी म्हणाली, 'मला रणबीरला सांगायचं होत तू प्रचंड क्यूट आहेस, पण मला भीती वाटत होती. तेव्हा मी रणबीरला सांगितलं तू खूप पातळ आहेस ... तेव्हा रणबीरला आभारी वाणी असं म्हणाला...' असं म्हणत वाणीने यावेळी रणबीरचं कौतुक केलं. 

दरम्यान, रणबीर आणि वाणी 'शमशेरा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 22 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सिनेमात अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 

 

Read More