Marathi News> मनोरंजन
Advertisement

Oops Moment : Urvashi Rautela सोबत झालं Wardrobe Malfunction

उर्वशी आपल्या स्टायलिश लूकमुळे कायमच चर्चेत 

Oops Moment : Urvashi Rautela सोबत झालं Wardrobe Malfunction

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. स्टायलीश लूकमध्ये लोकांनी उर्वशीला पसंत केलं आहे. इंटरनेटवर नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओतून उर्वशीला Oops Moment ला सामोरं जावं लागलं आहे. 

या व्हिडिओत उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपले कपडे ठिक करताना दिसत आहे. या व्हिडिओत वॉर्डरोब मालफंक्शन (Wardrobe Malfunction)मधील Oops Moment ला उर्वशी चांगल सांभाळून घेताना दिसत आहे. 

यामध्ये उर्वशीच्या  कॉन्फिडन्सची चर्चा होत आहे. १ दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ३० लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. उर्वशीने हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलं की,'अजून ग्लो करा.. स्वतःला शिक्षित करा... चांगले कपडे घालण्यासाठी प्रयत्न करा.'

उर्वशी रौतेला या व्हिडिओत एका इंग्रजी गाण्यावर मस्तीने डान्स करत आहे. या व्हिडिओत उर्वशीचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळत आहे. डार्क ग्रीन शिमरी रंगाचा आयशॅडो अभिनेत्रीने लावला आहे. 

31 डिसेंबरच्या एका पार्टीत उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. या पार्टीत ती केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. यासाठी उर्वशी रौतेलाला थोडेथोडके नव्हे तर चार कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्याहून थक्क करणारी बाब म्हणजे या पार्टीत उर्वशी रौतेलाने परिधान केलेला ड्रेस.

सध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाच्या या ड्रेसची प्रचंड चर्चा रंगली आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर या गाऊनमधील काही फोटो शेअर केले होते. लाल रंगाच्या या बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचे सौदर्यं नेहमीपेक्षा अधिक खुलून आले आहे. मायकल सिनको या डिझायनरने उर्वशीचा हा ड्रेस डिझाईन केला होता. हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल 150 तास लागले. तर या गाऊनची किंमत 32 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

Read More