Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्वशी पारदर्शक ड्रेसमध्ये स्वत:ला मिरवत आली पण... घडलं वेगळंच

उर्वशीने इस्रायलमध्ये झालेल्या 'मिस युनिव्हर्स 2021' स्पर्धेत जज म्हणून काम पाहिलं

उर्वशी पारदर्शक ड्रेसमध्ये स्वत:ला मिरवत आली पण... घडलं वेगळंच

मुंबई : नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा असे कपडे घालते की, तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खळबळ निर्माण होते. यावेळीही असंच काहीसं उर्वशी रौतेला सोबत घडलं आहे. नुकतचं उर्वशीने इस्रायलमध्ये झालेल्या 'मिस युनिव्हर्स 2021' स्पर्धेत जज म्हणून काम पाहिलं. या सौंदर्य स्पर्धेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पण या स्पर्धेनंतर उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीने गोल्डन आणि ब्लॅक कॉम्बिनेशनचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.  हा ड्रेस खूप लांब होता. त्यामुळे उर्वशीला ड्रेस सांभाळणं कठीण होत होतं. तिला नीट चालताही येत नव्हतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चालणं झालं कठीण
उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने लांब सी ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. या ट्रान्सपरंट ड्रेससोबत उर्वशीनेही डोक्यावर ट्रान्सपरंट दुपट्टा घेतला आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी पुन्हा पुन्हा ड्रेस हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जोराचा वारा आणि लांब गाऊनमुळे तिला चालणं झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्‍यामुळे उर्वशी या व्‍हिडिओमध्‍ये तिचा ड्रेस एडजेस्ट करण्यासाठी अनेकवेळा थांबते आणि त्यानुसार ड्रेस एडजेस्ट करण्‍याचा प्रयत्न करते.

Read More