Marathi News> मनोरंजन
Advertisement

Urvashi Rautela कांजीवरम साडीत फुलून आल सौंदर्य, पाहा फोटो

Urvashi Rautela च्या साडीतील सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाल, पाहा फोटो  

Urvashi Rautela कांजीवरम साडीत फुलून आल सौंदर्य, पाहा फोटो

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे (Urvashi Rautela) नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशीने तिच्या सौंदर्यामुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे मनमोहक फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. उर्वशीच्या सौंदर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीने आता कांजीवरम साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. उर्वशी कायम तिच्या सौंदर्यामुळे प्रकाशझोतात असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीने आता पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कांजीवरम साडी आणि त्यावर साजेसे दागिने देखील घातले आहेत. याशिवाय केसात माळलेला गजरा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

उर्वशी सिनेमांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

Read More