Marathi News> मनोरंजन
Advertisement

उर्वशी रौतेलाच्या पोस्टने एकचं खळबळ, म्हणाली,'...देखो जरा मोहब्बत से दूर होकर'

उर्वशी रौतेलाची ही पोस्ट नक्की कोणासाठी, तुम्हीच सांगा 

उर्वशी रौतेलाच्या पोस्टने एकचं खळबळ, म्हणाली,'...देखो जरा मोहब्बत से दूर होकर'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टमुळे तीचं नाव पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहशी (naseem shah) जोडलं गेलं होत. मात्र यावर तीने इन्स्टा पोस्ट करत मीडियाला अशा बातम्या न पसरवण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. (urvashi rautela instagram post viral in social media user comment rishabh pant name naseem shah bollywood)

उर्वशी रौतेलाच (Urvashi Rautela) नाव टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतशी (rishabh pant) नेहमीच जोडलं गेलं आहे. या संदर्भात दोघांमध्ये सोशल मीडियावर मोठा वादही झाला होता. या वादानंतर नुकतचं तिने ऋषभ पंतला सोशल मीडियावर सॉरी म्हटलं होतं. त्यामुळे या वादावर पडदा पडतोय की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती. मात्र या दरम्यानचं उर्वशीने इन्स्टाग्राम आणखीण एक पोस्ट केली आहे. या तिच्या पोस्टमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पोस्टमध्ये काय? 
उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) देसी स्टाईलमध्ये साडी नेसलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहले की, 'मौत से पहले भी एक और मौत होती है, देखो जरा अपनी मोहब्बत से दूर होकर.' असे तिने म्हटलेय. याचाच अर्थ असा की, मृत्युपुर्वी देखील आणखी एक मृत्यु होतो, बघा तुमच्या प्रेमापासून दूर राहून असा. या पोस्टची खुप चर्चा रंगली आहे. या पोस्टच्या कमेंटमध्ये ऋषभ पंतच्या नावाचा पुरच आला आहे. त्यामुळे या पोस्टनंतर पुन्हा एकदा उर्वशी आणि ऋषभ पंतच (rishabh pant) नाव जोडलं जातंय. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela)  'सिंह साब द ग्रेट' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीला कन्नड चित्रपट Mr. Airavata मध्ये पाहिले गेले होते. त्यानंतर ती सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, पागलपंती अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती, मात्र हे चित्रपट फारसे काही चालले नाहीत. आता तिच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलीय. 

Read More