Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरेरेरेर..लिक झालंच कसं? बाथरुम व्हिडीओ व्हायरल झाल्यावर Urvashi Rautela मॅनेजरवर संतापली, कॉल रिकॉर्डिंगही Viral

Urvashi Rautela Viral bathroom Video: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक खाजगी बाथरूम व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खळबळ उडाली आहे. अशातच आता ऑडिओ क्लिप देखील समोर आलीये.

अरेरेरेर..लिक झालंच कसं? बाथरुम व्हिडीओ व्हायरल झाल्यावर Urvashi Rautela मॅनेजरवर संतापली, कॉल रिकॉर्डिंगही Viral

Urvashi Rautela Viral Audio Clip: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी क्रिकेटर ऋषत पंतला उर्वशी डेट करत असल्याची अफवा समोर आली होती. अशातच आता उर्वशी रौतेला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतंय. काल उर्वशी रौतेलाचा बाथरूम व्हिडीओ (Urvashi Rautela bathroom Video) व्हायरल झाला होता. त्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्वशी रौतेला तिच्या मॅनेजरवर चिडल्याचं पहायला मिळतंय. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

एक डोकेदुखी बरी होत नाही तोपर्यंत उर्वशीला आणखी एक धक्का बसला आहे. उर्वशीचं तिच्या मॅनेजरसोबत फोन कॉल देखील व्हायरल झाला आहे. या फोन कॉलवर उर्वशी तिच्या मॅनेजरला झापताना दिसत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला का? असा सवाल उर्वशीने मॅनेजरला केलाय. हो उर्वशी, आम्ही पाहिलं का? आणि आमची टीम तिला इंटरनेटवरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असं मॅनेजर उर्वशीला सांगताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल कसा झाला? मला हाच प्रश्न पडलाय. मला आत्ताच्या आता टीमसोबत बोलायचं आहे, असा हट्ट उर्वशीने धरला होता. त्यानंतर होय, मी समजू शकतो, पण ही खराब वेळ आहे. सध्या फोनवरून बोलणं योग्य नाही, असं मॅनेजर सांगताना दिसतेय.

तुम्ही इथे 19 तारखेला आल्यावर तुम्हाला समोरसमोर मी विषय समजवून सांगते, असं मॅनेजरने म्हटलं आहे. 19 ला आपण या विषयावर बोलू, असं मॅनेजरने उर्वशीला म्हटलंय. पण का? असा सवाल उर्वशीने मॅनेजरला विचारला. तेव्हा मला याची काही कल्पना नाही. हे का घडलं आणि कशासाठी? यावर मला माहिती नाही. त्यामुळे तुम्ही इथे आल्यावर मी तुमच्याशी बोलेन, असं मॅनेजरने म्हटलं आहे.

 

उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेला कपडे बदलताना दिसतेय. पण हा व्हिडीओ पीआर स्टंट असल्याचे बोललं जातंय. उर्वशीच्या आगामी सिनेमातील हा व्हिडीओ असल्याचं समोर येत आहे. उर्वशीचा जहागिर नॅशनल यूनिव्हर्सिटी (जेएनयू) नावाचा सिनेमा येत आहे.

दरम्यान, नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा असे कपडे घालते की, तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खळबळ निर्माण होते. तिचा फॅशनसेन्स चाहत्यांना खूप आवडतो. तिच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहे. पण सुंदर दिसण्यासाठी उर्वशी खूप मेहनत घेत असते.

Read More