Marathi News> मनोरंजन
Advertisement

अतरंगी फॅशनची जादू चालली; एकताच्या चित्रपटातून उर्फी जावेदची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

Urfi Javed Debut In Bollywood: अतरंगी कपड्यांमुळं चर्चेत आलेली उर्फी जावेद लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एकता कपूरच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. 

अतरंगी फॅशनची जादू चालली; एकताच्या चित्रपटातून उर्फी जावेदची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

Urfi Javed Debut In Bollywood: आपल्या आगळ्या-वेगळ्या फॅशन सेन्सने आणि बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) लवकरच मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. बिग बॉस ओटीटीचे (Bigg Boss OTT) पहिले पर्व गाजवल्यानंतर उर्फी सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळं चर्चेत होती. तिच्या विचित्र फॅशनमुळं तीला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत उर्फीने तिचा फॅशन सेन्समध्ये थोडाही बदल केला नाही. आता लवकरच उर्फी बॉलीवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी चित्रपटात ती दिसणार असल्याची चर्चा आहे. (Urfi Javed In Bollywood)

उर्फी जावेद हे नाव सध्या वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत आहे. तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं व तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळं ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. इतकंच, नव्हे तर तिच्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणातही वादंग उठला होता. बोल्ड आणि अतरंगी पेहरावावरुन तिच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली होती. मात्र आता उर्फीचे नशीब चमकले आहे. लवकरच ती एकता कपूरच्या 'लव्ह, सेक्स, धोका 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते, अशी माहिती कळतेय. 

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, लव, सेक्स और धोका 2 या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी उर्फीशी संपर्क साधला आहे. उर्फीच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, उर्फीला लव्ह, सेक्स और धोका 2 साठी संपर्क करण्यात आला आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी उर्फी अगदी योग्य आहे. उर्फी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करु शकते. आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी उर्फी लवकरच बॉलिवूडमध्येही झळकण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, अलीकडेच उर्फीने अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रँम्प वॉककरत प्रसिद्धी मिळवली होती. याआधी बिग बॉस ओटीटी आणि स्प्लिट्सविलामध्ये ती दिसली होती. त्यानंतर तिच्या फॅशनमुळं ती चर्चेत आली होती. त्यानंतर तीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. उर्फीच्या फॅशनवरुन बॉलिवूडमधील काही कलाकारांनी तिच्यावर टीकादेखील केली होती. मात्र उर्फीने त्याला तोडीसतोड उत्तर दिलं होतं. 

2010मध्ये आलेल्या लव्ह, सेक्स और धोका या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच येणार आहे. टीमने अलीकडेच त्याचे पोस्टर जारी केले असून रिलीज डेटही जाहीर केली आहे. एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर हे पोस्टर पोस्ट केलं होतं. एलएसडी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात येणार आहे. 

Read More