Marathi News> मनोरंजन
Advertisement

शॉर्ट कपड्यांमध्ये पोझ देणं उर्फी जावेदला पडलं महागात, धाडकनं पडली

उर्फीची अशी फजिती, धाडकनं पडली : VIDEO 

शॉर्ट कपड्यांमध्ये पोझ देणं उर्फी जावेदला पडलं महागात, धाडकनं पडली

मुंबई : सोशल मीडियावर हॉट एण्ड सिजलिंग क्वीन उर्फी जावेद (Urfi Javed) ला चर्चेत राहायला येतं. ती सोशल मीडियावर खूप ती खूप ऍक्टिव असते. चित्रविचित्र ड्रेस घालून सगळ्यांच लक्ष वेधत असते. मात्र यावेळी उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा तोल गेल्याने ती धाडकन पडली आहे. 

पोझ देताना बिघडला बॅलेंस 

या व्हिडीओत उर्फी आपल्या फ्रेंडसोबत पायऱ्यांवरून उतरत आहे. दोघीही खाली उतरताना पोझ देत आहेत.

उतरताना खाली कोसळल्यामुळे उर्फी धाडकरून पडली आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

हा व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.  'ट्रेंड चुकीचा झाला'. हा व्हिडिओ पाहून लोक खूप हसत आहेत, असं देखील ती म्हणत आहे.

कुणी हसणारा इमोजी बनवला तर कुणी उर्फीला सजग राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे असा व्हिडीओ स्वतः शेअर करण्याचे धाडस दाखवणाऱ्या उर्फीचं कौतुक देखील होत आहे. 

हिजाब मुद्यावर बोलली उर्फी 

कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. यावर अनेक सेलिब्रिटींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता 'बिग बोस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेदने देखील 'हिजाब' प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. उर्फी कायम तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे चर्चत असते. पण आता ती हिजाब प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. 

माध्यमांसोबत संवाद साधताना हिजाबवर उर्फी म्हणते, 'महिला त्यांना हवे तसे कपडे घालू शकतात. महिलांचे कपडे त्यांचं शिक्षण ठरवू शकत नाही. मला कळत प्रत्येक शाळेचे नियम असतात. पण भारतात धर्म एक संवेदनशील विषय आहे...'

'महिला हिजाब घालत आहेत, तर त्या काही चूक करत नाहीत. प्रत्येकाला स्वतंत्र आहे. ज्या महिला हिजाब घालतात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं.  मी लहानपणापासून हिजाब घातला नाही...'

Read More