Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बहुत गर्मी' म्हणत एअरपोर्टवर उर्फीनं काढले कपडे!

Urfi Javed Video : उर्फी जावेदनं विमानतळावर सगळ्यांसमोर काढले कपडे! व्हिडीओ होतोय व्हायरल

'बहुत गर्मी' म्हणत एअरपोर्टवर उर्फीनं काढले कपडे!

Urfi Javed Video : सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी ही विचित्र आणि हटके ड्रेसिंगमुळे चर्चेत राहते. ती प्रत्येतवेळी काही तरी वेगळी स्टाईल करते आणि तिचा ड्रेस पाहून सगळ्यांनाच आश्चर्य होते. उर्फी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या 'एलएसडी 2' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट अडल्ट कंटेंटवर बनवण्यात आला आहे. तर सध्या उर्फी ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीनं गरम होतंय असं म्हणतं विमानतळावर कपडे काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी सुरुवातीला गुलाबी रंगाच्या टॉवेलपासून बनवलेला ड्रेस घालून आली. त्यानंतर उर्फीनं पापाराझींना पोज दिल्या. मात्र, जेव्हा गरम व्हायला लागलं तेव्हा उर्फीनं पापाराझींसमोर म्हटलं की खूप गरम होतं... आता माझ्याकडून सहन होत नाही. त्यानंतर उर्फी लगेच तिचा ड्रेस काढू लागली. उर्फीनं त्या ड्रेस खाली लाल रंगाचं टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची टाईट्स परिधान केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत दिसलेल्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान!

दरम्यान, उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'ती जे काही परिधान करते त्यात सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'आज इतकी सभ्य कशी काय झाली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला पहिल्यांदा तिचा कोणता ड्रेस आवडला आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ही बाई इतकं डोकं कसं लावते? तर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय की पूर्ण ब्लॅंकेट ओढून घेतलंय. माझ्या समोर असलेल्या सिग्नलवर असेच सेम कपडे एका बाईनं परिधान केले होते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हिला कधीना कधी पागल श्वानानं नक्कीच चावलं असेल.' एक नेटकरी म्हणाला, 'असे कपडे घालून ही जाते कुठे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे कपडे विमानतळावक चालतात का?' तिसरा नेटकरी म्हणाला, घरी होती तेव्हा तिनं घालून पाहिलं नव्हतं का आणि पाहिलं तर तिला ती कळलं नाही का?' 

Read More