Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा पाहिला...', Pamela Chopra मृत्यूनंतर Uday Chopra ट्रोल

Uday Chopra Trolled : यश चोप्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उदय चोप्रा हा आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरणला पाहून हसताना दिसतो. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

'आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा पाहिला...', Pamela Chopra मृत्यूनंतर Uday Chopra ट्रोल

Uday Chopra Trolled : दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा (Pamela Chopra) यांचे काल गुरुवारी 20 एप्रिल रोजी निधन झाले. कालच पॅमेला चोप्रा त्यांच्यावर सकाळी 11 वाजता मुंबईत त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूडमधील अनेक कलाकार चोप्रा कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन करत आणि त्यांच्या दु: खात सामिल झाले होते. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत उदय चोप्रा (Uday Chopra) हसताना दिसत आहे. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. 

उदय चोप्राचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. त्या व्हिडीओत आमिर खान असल्याचे दिसत आहे. आमिरसोबत त्याची एक्स वाईफ किरण देखील यावेळी त्याच्यासोबत चोप्रा यांच्या घरी पोहोचली होती. दरम्यान, यावेळी आमिर भेटायला येताच उदय चोप्रा त्यांच्याशी बोलत असताना हसायला लागला हे पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.     

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, आपल्या आईच्या निधनावर हसणारा पहिला मुलगा. दुसरा नेटकरी म्हणाला, निर्लज्ज उदय चोप्रा. तिसरा नेटकरी म्हणाला, हा अंबानींचा कार्यक्रम नाही, अंत्यसंस्काराचा आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, अरे तुझ्या आईचं निधन झालंय, कसा हसू शकतोस तू. दुसरा नेटकरी म्हणाला, अरे ए हे लग्नाचं रिसेप्शन नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अमिताभ बच्चन, शाहरुख खानसोबत त्याचा मुलगा आर्यन खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, रणवीर सिंग, विकी कौशल, शबाना आझमी, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक कलाकार पामेला चोप्रा यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते. 

हेही वाचा : ट्रेलर, प्रेमाशन नसूनही Pushpa 2 च्या हिंदी व्हर्जनची कोट्यवधींची कमाई; जमवला 'इतका' गल्ला

बॉलिवूड चित्इंरपटसृष्टीतील सर्वात मोठी निर्माता कंपनी यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्राची आई पॅमेला चोप्रा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. चित्रपट निर्माते आदित्य चोप्राची आई पॅमेला चोप्रा या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यानंतर पॅमेला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर पॅमेला चोप्रा यांनी या जगाचा निरोप घेतला.

पॅमेला यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या एक उत्तम गायिका असून त्यांनी पती यश चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तर 1993 साली प्रदर्शित झालेल्या 'आईना' या चित्रपटाची निर्माती पॅमेला चोप्रा यांनी केली होती.

Read More