Marathi News> मनोरंजन
Advertisement

ते जटायू...; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली...

Kangana Ranaut: कंगना रणौत हिने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा सर्व प्रसंग शेअर केला आहे. 

ते जटायू...; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली...

Kangana Ranaut: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता देशभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मोठे उद्योजक, कलाकार देखील या सोहळ्याचे साक्षीदार होते. कलाजगतातून अमिताभ बच्चन, रजनीकांत, आलिया-रणबीर, कतरिना-विकी कौशल आणि कंगना रणौट हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यामचा एक प्रसंग कंगनाने शेअर केला आहे. 

अयोध्या राम जन्मभूमी येथे राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सुरू असताना कंगनासोबत एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा केला आहे. एका पोस्टच्या माध्यमातून तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे. 

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात कंगनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताच कंगना जय श्री रामच्या घोषणा देताना दिसत होती. त्याचदरम्यान कंगनासोबत एक प्रसंग घडला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने पूर्ण घटनेबाबत सांगितलं आहे. कंगनाने मूर्तीकार अरुण योगीराजसोबत घडलेली एक घटना शेअर करत म्हटलं आहे की, एक आश्चर्यचकित करणारी घटना माझ्यासोबत घडली आहे. 

कंगनाने पुढे म्हटलं आहे की, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून फूलांची बरसात होण्यास सुरुवात झाली. तेव्हा मी वरती आभाळाकडे पाहिल्यानंतर मला दोन विशालकाय पक्षी (गरुड) लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून उडताना दिसत होते. जसं काही तेपण फुलांची उधळण करत आहेत. ते पाहून माझ्या बहिणीने सांगितले की ते पहा जटायू आणि संपाती. आम्ही पुन्हा वर पाहिले तर ते दिसले नाहीत. कोणी-कोणी त्या दोन दिव्य पक्षांना पाहिले?. असा सवालही कंगनाने तिच्या पोस्टमधून केला आहे. कंगनाची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.

कंगनाच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक चमत्कारिक घटना घडल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टने केला आहे. या घटनेनंतर राम मंदिरात तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांनादेखील आश्चर्य वाटले. संध्याकाळच्या आरतीआधी गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीजवळ एक मर्कट पोहोचले होते. आधी सर्वांना वाटले की हे मर्कट रामलल्लाच्या मूर्तीला नुकसान पोहोचवणार मात्र, तो एकटक मूर्तीकडे पाहत बसला होता. आणि नंतर तिथून तो शांतपणे निघून गेला. ही संपूर्ण घटना मंदिर ट्रस्टने ट्विटरच्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केली आहे. 

Read More