Marathi News> मनोरंजन
Advertisement

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, 'तसले' फोटो व्हायरल करायची धमकी देऊन 11 लाख उकळले

Honey Trapping:  नित्या घर बघायला आली आणि दोघांची चांगलीच मैत्री झाली. ती घरात शिरली आणि ि त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत नग्न छायाचित्रे काढू लागली. यानंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. बिनूही तिथे उपस्थित होती आणि ती त्यांचे फोटो काढत होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, 'तसले' फोटो व्हायरल करायची धमकी देऊन 11 लाख उकळले

Honey Trapping: सध्या हनी ट्रॅपिंगची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. एखाद्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, त्याच्या भावनेशी खेळून नको ते करवून घ्यायचे आणि याचे चित्रीकरण करुन त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करायचे असे प्रकार घडत असतात. यामध्ये आता अभिनेत्रीदेखील असल्याचे समोर आले आहे. साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणात एका वृद्धाला अडकवून त्याच्याकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे.

नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. तर परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नित्या स्वतः एक वकील देखील आहे.

fallbacks

75 वर्षीय माजी सैनिकाला ओढले जाळ्यात 

समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघींनी मिळून केरळ विद्यापीठातील माजी कर्मचारी आणि 75 वर्षीय माजी सैनिक (तिरुवनंतपुरम) यांना आपला बळी बनवले आहे. या घटनेची सुरुवात 24 मे रोजी झाली. संबंधित व्यक्तीला त्याचे घर भाड्याने द्यायचे होते आणि नित्याने त्याच्याशी फोनवर संपर्क साधला.

कपडे उतरवले आणि त्यांच्यासोबत फोटो काढले

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांनी नित्या घर बघायला आली आणि दोघांची चांगलीच मैत्री झाली. ती घरात शिरली आणि ि त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत नग्न छायाचित्रे काढू लागली. यानंतर तिने धमक्या देण्यास सुरुवात केली. बिनूही तिथे उपस्थित होती आणि ती त्यांचे फोटो काढत होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

दोघींनी त्याच्याकडे 25 लाखांची केली मागणी 

दोघींनी त्याच्याकडे 25 लाखांची मागणी केली आणि ती छायाचित्रे सोशल मीडियावर लीक करण्याची धमकीही दिल्याचे बोलले जात आहे. अनेक धमक्या दिल्यानंतर अखेर त्या व्यक्तीने त्याला 11 लाख रुपये दिले. आता हे प्रकरण संपेल, असे त्याला वाटले, मात्र त्यानंतर त्याने पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. यानंतर त्यांनी 18 जुलै रोजी परावूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Read More