Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sidharth Shukla Death : पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर होणार मृत्यूचा उलगडा, पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही

Sidharth Shukla Death : पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर होणार मृत्यूचा उलगडा, पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

मुंबई : अभिनेता, मॉडेल सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) चटका लावणारा मृत्यू झाला. सिद्धार्थचं वय फक्त 40 वर्ष होतं. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर ते स्पष्ट होईल. कूपर हॉस्पिटलमध्ये (cooper hospital) संध्याकाळी त्याच्या पार्थिवाचं पोस्टमार्टेम झालं. तीन डॉक्टरांच्या टीमनं पोस्टमार्टे केलं. त्याचा अहवाल उद्या मिळणार असल्यानं मृत्यूचं कारण उद्याच स्पष्ट होणाराय. 

त्याचा व्हिसेरा, ब्लड सॅम्पल आणि इतर बाबीही प्रिझर्व्ह करून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, उद्याच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तोपर्यंत त्याचं पार्थिव कूपर हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल. 

बिगबॉस 13 पर्वाचा (bigg boss season 13) विजेता असलेला सिद्धार्थ घराघरांत पोहोचला होता. बिग बॉस, बालिका वधू, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा, सावधान इंडिया, इंडियाज गॉट टॅलेंट, अशा अनेक मालिका, रिएलिटी शोमध्ये सिद्धार्थने काम केलं होतं.

Read More