Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलाच्या बारशासाठी वहिणीसाहेबांनी बनवलेल्या केकमध्ये दडलंय...

यावेळी अगदी डेकोरशन पासून ते मुलाच्या कॉस्टूमपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी हटके पद्धतीने करण्यात आल्या होत्या..पण त्यात बाळासाठी खास तयार करण्यात आलेल्या बारशासाठीच्या स्पेशल केकने सगळ्याचंच लक्षवेधून घेतलं.  

मुलाच्या बारशासाठी वहिणीसाहेबांनी बनवलेल्या केकमध्ये दडलंय...

प्रेरणा कोरगांवकर, मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिणीसाहेबांची दमदार खलनायिकी भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते. धनश्रीने या मालिकेचा निरोप घेतल्यानंतर तिने डान्सिंग क्वीन या रिआलिटी शो मध्ये आपल्या डान्सची जादू दाखवली. आणि त्यानंतर लगेचच धनश्री प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज समोर आली.

प्रेग्नेंसीच्या काळात देखील धनश्रीने एकापेक्षा एक अशा हटके अंदाजात आपलं बेबी बम फ्लॉन्ट करत फोटोशूट केलं होतं. तिच्या प्रत्येक पोस्टची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली होती. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर धनश्री सोशल मीडियापासून काही काळ लांब होती. त्यानंतर पुन्हा एकदा तेवढाच जोमाने धनश्रीने वेगवेगळे पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

fallbacks

नुकताच धनश्रीच्या मुलाचा बारसा अगदी दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी अगदी डेकोरशन पासून ते मुलाच्या कॉस्टूमपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी हटके पद्धतीने करण्यात आल्या होत्या.. पण त्यात बाळासाठी खास तयार करण्यात आलेल्या बारशासाठीच्या स्पेशल केकने सगळ्याचंच लक्षवेधून घेतलं.

 

धनश्रीने खास बनवून घेतलेल्या केकवर चिमुकल्या सोनेरी पाळण्यापासून ते फळं आणि मिठाईपर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. चिमुकल्याचा एक क्लोज अप फोटो शेअर करत कबीर असं मुलाचं नाव ठेवण्यात आल्याचं धनश्रीने चाहत्यांसोबत फायनली शेअर केलं. 

Read More