Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीचं गुपचूप लग्न

लॉकडाऊनमध्ये हुरकलं लग्न 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीचं गुपचूप लग्न

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेक कलाकारांनी अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील अशीच एक जोडी विवाहबद्ध झाली आहे. (Tujhat Jiv Rangala fame Sakhi aka Rucha Apte married with Kshitish Date ) 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणाच्या कोचची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा आपटे आणि 'मुळशी पॅटर्न' सिनेमातील अभिनेता क्षितीश दाते हे दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. 

या दोघांनी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुपचूप साखरपुडा केला होता. यावर्षी ही एक वर्षानंतर दोघांनी गुपचूप लग्न केलं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. यावर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

fallbacks

एक वर्षापूर्वी देखील या दोघांनी फोटो पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rucha apte (@rucha.apte)

अभिनेता क्षितिश दाते आणि ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकल्याचं समजत आहे. अर्थात त्यांनी अगदी शांततेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या काही मित्रमंडळींनी आज त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडीने बनमस्का या मालिकेत एकत्र काम केलं होत. मित्र -मैत्रिणींच्या जीवनावर आधारित ही मालिका लोकांची अजूनही आवडती आहे. पुण्याचे असणारे ऋचा आणि क्षितीश हे दोघे मालिकां बरोबरच नाटकात ही काम करतात.

Read More