Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sara Ali Khanसोबतच्या रिलेशनशिपवर Kartik Aryanने सोडलं मौन; ''वर्षभरापासून मी...''

आता कार्तिक आर्यनने आपल्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. 

 Sara Ali Khanसोबतच्या रिलेशनशिपवर Kartik Aryanने सोडलं मौन; ''वर्षभरापासून मी...''

Kartik Aryan-Sara Ali Khan : बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन (Kartik Aryan)मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच्या 'लव्ह आज कल 2' चित्रपटादरम्यान त्याचं नाव सारा अली खानसोबत (Sara Ali Khan)जोडलं गेलं. दोघांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर रंगू लागल्या. मात्र हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल कधीही बोलले नाहीत. आता प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar)सारा अली खान आणि कार्तिकच्या ब्रेकअफ झालाचं म्हटलं आहे. 'कॉफी विद करण'च्या (Koffee With Karan) एका सिझनमध्ये करण बोलला होता. यावर कार्तिक आर्यनने काहीच रिअ‍ॅक्शन दिली नव्हती. मात्र आता कार्तिक आर्यनने आपल्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. (trending news kartik aaryan first time open up on relationship with sara ali khan)

काय म्हणाला कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन त्याच्या रिलेशनशिपविषयी फार काही बोलला नाही. मात्र, कार्तिकने त्याची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. पण या क्षणी तो सिंगल असल्याचा खुलासा कार्तिकने केला आहे. जेव्हा कार्तिकला एका मुलाखतीत म्हटलं गेली की, 'कॉफी विथ करण'मध्ये दिलेल्या त्याच्या लव्ह लाईफबद्दलची त्याची पूर्वीची विधानं खोटी वाटतात, तेव्हा तो म्हणाला की, 'मी गेल्या दीड वर्षांपासून सिंगल आहे, त्याशिवाय मला काही माहीत नाही.'

कार्तिक वक्तव्यावरून पलटला

कार्तिकने तत्काळ आपलं वक्तव्य बदललं. जेव्हा कार्तिकला सांगण्यात आलं की, तो सव्वा वर्षापासून सिंगल आहे हे रेकॉर्ड केलं जात आहे. यानंतर कार्तिक म्हणाला की, मी एक वर्षांपासून सिंगल आहे. मी टाइम हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीय. मग त्याला विचारण्यात आलं की, आता तुझं फक्त तुझ्या कामासोबत नातं आहे का? यावर उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, 'नाही असं नाही, पण मी सिंगल आहे आणि हेच सत्य आहे.'

Read More