Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्याकडून मिळालेला आदर पाहून ट्रान्सवुमन सायेशाला अश्रू अनावर; म्हणाली,'तिने आराध्यालाही शिकवलं...'

कंगना रानौतच्या रिएलिटी शोमधून घरा घरात पोहचलेला स्‍वप्निल श‍िंदे म्हणजेच सायशा शिंदे ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. काही वर्षांपुर्वी तिने सेक्स चेंज करुन पुरुष ते महिला बनली आणि स्वत:ला ट्रान्सवुमन असल्याची घोषणा केली आहे. यावेळी ती तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती ऐश्वर्या बच्चनचं कौतुक करताना दिसत आहे. 

ऐश्वर्याकडून मिळालेला आदर पाहून ट्रान्सवुमन सायेशाला अश्रू अनावर; म्हणाली,'तिने आराध्यालाही शिकवलं...'

मुंबई : कंगना रानौतच्या रिएलिटी शोमधून घरा घरात पोहचलेला स्‍वप्निल श‍िंदे म्हणजेच सायशा शिंदे ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. काही वर्षांपुर्वी तिने सेक्स चेंज करुन पुरुष ते महिला बनली आणि स्वत:ला ट्रान्सवुमन असल्याची घोषणा केली आहे. यावेळी ती तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती ऐश्वर्या बच्चनचं कौतुक करताना दिसत आहे. ऐश्वर्याची साईशा शिंदेंसोबत वागण्याची पद्धत आणि तिच्याकडे तिचा पहायचा दृष्टीकोन पाहून साईशा शिंदे भावूक झाली आहे. 

साईशा शिंदे ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात तिचं खूप मोठं नाव आहे.  अनेक सिनेमात तिने तिच्या कामाचं कौशल्य दाखवलं आहे. काही वर्षांपुर्वी तिने खुलासा करत सांगितलं कीस ती एक ट्रान्सवुमन आहे. ट्रान्सवुमन होण्याआध साईशाचं नाव स्वप्निल होतं. नुकतीच साईशाने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायचं भरभरुन कौतुक केलं आहे. नुकतीच तिने टिस्का चोप्राला मुलाखत दिली, तिने त्या काळाची कहाणी सांगितली जेव्हा जगाला तिच्या ट्रान्सवुमन असण्याबद्दलचं सत्य माहिती नव्हतं. मात्र जेव्हा सगळ्यात आधी ऐश्वर्या राय बच्चनला तिच्या बद्दल हे समजलं तेव्हा तिच्या स्थित्यंतराचा आदर करत तिला तिने खूप आदर दिला. 

दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना साईशा म्हणाली, ''ही गोष्ट तेव्हा न्यूजपेपरमध्ये आली नाही. इंडस्ट्रीमधील केवळ माझ्या जवळच्या मित्रांनाच याबद्दल माहिती होतं आणि माझी ऐश्वर्यासोबत मैत्री झाली होती. यासाठी मी ऐश्वर्याच्या मॅनेजरला सांगितलं की, तयार राहा. हा स्वप्निल नाहीये, जो तुमच्या समोर येणार आहे ती साईशा आहे. या गोष्टीची काळजी घ्या मॅम अजून बाकिच्या लोकांनाही हे ऐकून शॉक बसायला नको. सगळं ठिक असूदे.''

साईशाने पुढे सांगितलं की,  ऐश्वर्या रायच्या मॅनेजरने या गोष्टची काळजी घेतली की, सगळ्यांना कळायला हवं की,  ती सायशा शिंदे आहे, स्वप्नील नाही.  जेव्हा मी फिटिंगसाठी गेले, तेव्हा ऐश्वर्यानेही याची काळजी घेतली की, मला प्रत्येकवेळी त्यानंतर तिने साईशा म्हणाली. यानंतर तिने प्रत्येक वेळी मला त्याच नावाने हाक मारायला सुरुवात केली. मला आदर दिला. ऐश्वर्याने जशी मला इज्जत दिली तसंच तिने तिच्या लेकीला आराध्यालाही अशीच शिकवण दिली आहे. ऐश्वर्याची मुलगी आराध्या जेव्हा आत आली तेव्हा तिने माझी तिच्या लेकीशी ओळख साईशा नावाने करून दिली.

साईशा पुढे म्हणाली, ती हे सगळं बघून मी भारावून गेली आणि मला अश्रू अनावर झाले. त्यावेळी मी खूपच भावूक झाली होती. ऐश्वर्याने स्वप्निलला साईशा प्रति प्रेम दिलं. मी तो क्षण कधीच विसरु नाही शकत. आजही मी ते क्षण मला आठवतात. तसं तर साईशाच्या हिंमतीला दाद द्यायला हवी की तिने समाजाची पर्वा न करता आपल्या हृद्याची हाक ऐकली आणि स्वत:ला ट्रान्सवुमन असल्याचं कबूल केलं आणि सेक्स चेंज केला. आज ती तिच्या आयुष्यात खुप खूश आहे. 

Read More