Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTO : पाहा दीपिकाचं 'अस्सं सासर सुरेख बाई'!

इटलीत डेस्टिनेशन वेडिंगच्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ते विवाहबद्ध झाले 

PHOTO : पाहा दीपिकाचं 'अस्सं सासर सुरेख बाई'!

मुंबई : 'तेनू ले के मै जावांगा....' असं म्हणत अभिनेता रणवीर सिंगने अखेर त्याची दुल्हन म्हणजेच दीपिका आपल्या घरी आणलं आहे. इटलीत डेस्टिनेशन वेडिंगच्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात दीपिका आणि रणवीरने एकमेकांना साथ देण्याची वचनं दिली आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

इटलीत कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर हे दोघंही भारतात परतले. रणवीरच्या मुंबईतील घरी दीपिकाचं दणक्यात स्वागतही झालं. 

मुख्य म्हणजे त्यांच्या विवाहसोहळ्याला काही दिवस उलचले असले तरीही त्याविषयीच्या चर्चा आणि फोटो पाहण्यासाठीची चाहत्यांमध्ये असणारी उत्सुकता तसूभरही कमी झालेली नाही. 

सोशल मीडियावर 'दीप-वीर'च्या लग्नाच्या दिवशीचा प्रत्येक फोटो हा व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवत आहे. असाच एक फोटो सध्या कलाविश्वातही सर्वांनाच #FamilyGoals देत आहे. 

कारण या फोटोमध्ये लाडक्या दीपिकाच्या सासरची मंडळी म्हणजेच तिचं सासरचं कुटुंब पाहायला मिळत आहे. त्यामुळे नकळत का असेना,  'अस्सं सासर सुरेख बाई'! याच ओळी अनेकजण म्हणत आहेत. 

कोंकणी विवाहसोहळ्यातील हा फोटो असून, त्यात रणवीरचे आई-बाबा, अंजू सिंग भवनानी आणि जगजीत सिंग भवनानी दिसत आहेत. सोबतच रणवीरची बहीण, रितिकाही या फोटोमध्ये दिसत आहे. 

नव्या सुनेच्या येण्याने रणवीरच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही लपून राहत नाही. तर, या नव्या कुटुंबात प्रवेश करणाऱ्या दीपिकाच्या चेहऱ्यावरील भावमुद्राही पाहण्याजोगी आहे. 

 
 
 
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on
Read More