Marathi News> मनोरंजन
Advertisement

एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : या मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती शाहरुखची हिरोइन होण्याची संधी, मात्र एका गोष्टीमुळे...

एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा ही सगळ्यांनाच असते. त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यात ती संधी जर आपल्याला मिळाली तर आपल्या करिअरला खूप चांगला ब्रेक मिळेल, असे अनेकांना वाटते. अशीच एक संधी ही एक मराळमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती. मात्र, अचानक असं काही झालं की तिचं नशिब पालटलं आणि तिला मिळालेली संधी ही हातातून सुटली. 

शाहरुख खानचा 2014 साली प्रदर्शित झालेला 'हॅप्पी न्यू इअर' हा चित्रपट सगळ्यांच्या लक्षात असेलच. या चित्रपटातील मनावा लागे हे गाणं आणि त्यातील दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मात्र, दीपिकाच्या जागी दुसरी अभिनेत्री दिसली असती. त्यासाठी दिग्दर्शिका फराह खानची पहिली पसंत ही मराठमोळी अभिनेत्री होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मराठमोळी अभिनेत्री कोण तर ती दुसरी कोणी नसून अंकिता लोखंडे आहे. पण अंकिताच्या हातून हा चित्रपट निसटला. अंकिताच्या जुन्या मुलाखतीतील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिनं बॉलिवूडच्या चित्रपटांची ऑफर मिळाल्यानंतर ते कशामुळे निसटले याविषयी सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकितानं त्या व्हिडीओत रामलीला या दुसऱ्या चित्रपटाचा देखील उल्लेख केला. अंकितानं सांगितलं की रामलीलासाठी तिनं लूक टेस्ट दिली होती पण माझं सिलेक्शन झालं नाही. त्याशिवाय तिला बदलापुर या चित्रपटासाठी देखील फोन आल्याचं सांगत अंकिता म्हणाली, 'त्यावेळी मी पवित्र रिश्ता करत होते. तेव्हा मी विचार केला की मी हाच शो पुढे करणार, कारण त्याआधी दोन चित्रपटांमध्ये काही झालं नाही, तर माझं मन द्विधावस्तेत अडकलं होतं. मी बदलापुरच्या दिग्दर्शकांशी सुद्धा बोलायला गेली नाही.'

हेही वाचा : मालिका लोकप्रिय होत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्रीला कर्करोग, मध्येच सोडला शो!

दरम्यान, अंकितानं 'मणिकर्णिका' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं झलकरीबाईची भूमिका साकारली होती. तर 'बागी 3' या चित्रपटात तिनं रुची ही भूमिका साकारली होती. अंकिता काही दिवसांपासून 'बिग बॉस' या कार्यक्रमामुळे चर्चेत होती. त्यात ती तिचा पती बिझनेसमॅन विकी जैनसोबत दिसली होती. 

Read More