Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोत दिसणारा हा लहान मुलगा आहे दबंग अभिनेता, ओळखलंत का?

कोण आहे हा अभिनेता...
 
 

फोटोत दिसणारा हा लहान मुलगा आहे दबंग अभिनेता, ओळखलंत का?

Guess Who : फोटोत बहिणीसोबत दिसणारा हा मुलगा आता मोठा होऊन बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन बनला आहे. त्याचे वडील देखील त्यांच्या काळातील सुपरस्टार आहेत आणि भाऊ देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. या मुलाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. हा मुलगा चित्रपट जगतात त्याच्या जबरदस्त डायलॉगसाठीही प्रसिद्ध आहे. या मुलाच्या सुपरस्टार वडिलांनी दोन लग्न केले आहेत आणि त्याची सावत्र आई देखील एक लोकप्रिय स्टार आहे. 

कदाचित तुम्ही आतापर्यंत या मुलाला ओळखले असेल आणि ज्यांना हे सांगता आले नसेल, त्यांना सांगा की हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओलचा बालपणीचा फोटो आहे. हा फोटो रक्षाबंधनाचा आहे, जो त्याने स्वतः त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

सनी देओलने गदर चित्रपटात 'हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और हमेशा रहेगा', घातक चित्रपटात सातो को सात मारुंगा, एक साथ मारूंगा. घायलमध्ये, बलवंत राय मैं तुम्हे 24 घंटे के अंदर मार दूंगा, चित्रपटातील हे डायलॉग प्रेक्षकांना खूप आवडले होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी देओलने त्याच्या काळातील सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले. सनीने त्याच्या चित्रपट प्रवासात एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. घायल, बेताब, घातक, डर, गदर, त्रिदेव, दामिनी और जीत यांसारखे उत्तम चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले. घायलमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झाले, ज्यासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

Read More