Marathi News> मनोरंजन
Advertisement

रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

Raveena-Karishma : रवीना करिश्मा या दोघांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक थेट त्यांना खांबाला बांधून जेवायला गेला होता. 

रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

Raveena-Karishma :  बॉलिवूडनं आजवर आपल्याला अनेक असे चित्रपट दिले आहेत जे आपल्या लक्षात आहेत. त्यात काही चित्रपट तर कल्ट मुव्ही आहेत. तर काही क्लासिक सिनेमा म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे राजकुमार संतोषी यांचा 'अंदाज अपना-अपना' हा चित्रपट. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान या दोघांसोबत या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाची पटकथा जितकी मजेशीर आहे. तितक्याच मजेशीर गोष्टी या चित्रपटाच्या सेटवर झाल्या. हा करिश्मा कपूरनं एका मुलाखतीत कशा प्रकारे दिग्दर्शकानं तिला आणि रवीनाला एका खांबाला बांधलं होतं याविषयी सांगितलं. 

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनं IMDB च्या एका जुन्या मुलाखतीत 'अंदाज अपना-अपना' च्या सेटवर मजेशीर किस्सा शेअर केला. यावेळी करिश्मानं सांगितलं की चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी, जेव्हा क्रुमधील लोक तीन-तीन शिफ्टमध्ये काम करत होते. तेव्हा सतत दिवस-रात्र काम केल्यानं ते दमले होते. यावेळी क्लायमॅक्सन सीन दरम्यान, तिला आणि रवीनाला टंडनला एका खांबाला बांधलं होतं. सीनमध्ये असं काही झालं की सलमान आणि आमिर फाइट करण्यासाठी येतात. त्यानंतर ते हीरोइन्सला वाचवतात. करिश्मानं सांगितलं की, या सीनच्या शूटमध्ये लंच ब्रेक झाला आणि संपूर्ण यूनिट दुपारी जेवण करण्यासाठी गेले आणि त्यावेळी ते रवीना आणि तिला विसरले. त्यांना तसंच खांबाला बांधून सोडून गेले. 

हेही वाचा : नवऱ्यापासून दूर जाण्याची ऐश्वर्याला वाटते भीती! डॉमिनेटिंग म्हटल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर

करिश्मा कपूरनं एका मुलाखतीत सांगितलं की प्रत्येक व्यक्ती या दोघांना खांबाला बांधलेलं सोडून जेवायला गेले. तेव्हा दोघांनी सगळ्यांना आवज देत बोलावलं आणि मग ते लोक आले आणि त्यांनी खांब्यावरून सोडावले. राजकुमार संतोषी यांचा अंदाज अपना अपना हा चित्रपट 1994 मध्ये केला होता. या चित्रपटात खूप विनोद आणि ड्रामा पाहायला मिळाला. अंदाज अपना अपना या हिंदी चित्रपटाला कल्ट कॉमेडी चित्रपटांमध्ये मोजण्यात येते. या चित्रपटानं सगळ्यांची मने जिंकली होती. आजही प्रेक्षक काही असेल तर हा चित्रपट पाहतात. 

Read More