Marathi News> मनोरंजन
Advertisement

या ठिकाणी मिळतो 'दीपिका पदुकोण डोसा'

दीपिकाने शेअर केले फोटो 

या ठिकाणी मिळतो 'दीपिका पदुकोण डोसा'

मुंबई : अगदी लग्नापासून दीपिका पदुकोणची चर्चा होत आहे. पण आता या चर्चेचं कारण थोडं वेगळं आहे. दीपिकाचे चाहते संपूर्ण जगभरात आहे. तिच्या चाहत्यांकडून फॅन्स क्लबदेखील चालवले जातात. पण आता एक वेगळीच आणि हटके गोष्ट समोर आली आहे. 

चक्क दीपिकाच्या नावाचा 'डोसा' विकला जात आहे.  सोशल मीडियावर दोन मेन्यू कार्ड व्हायरल झाले आहेत. यामध्ये दीपिकाच्या नावाचा 'डोसा' आणि 'पराठा थाली' मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. 

खालील फोटो हा अमेरिकेतील टेक्ससमधील ऑस्टिनमधला आहे. येथील डोसा लॅब्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये 'दीपिका पदुकोण डोसा' मिळत आहे. 

या डोसा यादीत वेगवेगळे व्हरायटीची नावे यामध्ये दिली गेली आहेत. ज्यामध्ये दीपिका पदुकोणच्या नावाचा देखील उल्लेख आहे. 

या दीपिका पदुकोण डोसामध्ये सर्वात तिखट मिरची गोस्ट चिली आणि आलू मिक्सचा स्वाद मिळतो. या मेन्यूची किंमत 10 डॉलर ठेवण्यात आली आहे. 

दीपिकाच्या नावाची थाली तर पुण्यात एका रेस्ट्रॉरंटमध्ये दीपिका पदुकोण नावाची थाली मिळत आहे. मेनू कार्डमध्ये 'दीपिका पदुकोण पराठा थाली' मिळत आहे. या थालीत ग्राहकांना भाजी, राजमा - छोले, दाल मखनी, रोटी, भात, सलाड, पापड, स्वीट डिश मिळणार आहे. या थालीकरता ग्राहकांना 600 रुपये मोजावे लागणार आहे.

व्हायरल झालेल्या या मेन्यू फोटोमध्ये भगत सिंह, युवराज सिंह, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, यो यो हनी सिंह सारख्या कलाकारांच्या नावाच्या थाली देखील आहेत. 

सगळ्यात महाग थाली दारा सिंह नावाची असून याची किंमत 2400 रुपये लिहिण्यात आली आहे. 

Read More