Marathi News> मनोरंजन
Advertisement

The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

The Vaccine War Poster : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आता त्यांचा दुसरा एक चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

The Vaccine War Poster : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विवेक अग्निहोत्रींची. 2022 साली प्रदर्शित झालेल्या 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटानंतर ते फारच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. त्यातून बॉलिवूडवर अनेकदा टीकाही करताना दिसतात. अशावेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आता त्यांचा 'द काश्मिर फाईल्स'चा दुसरा भागही प्रदर्शित होणार आहेत. त्यातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या अशाच एका चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचे पोस्टर हे सोशल मीडियावरून व्हायरल होते आहे. त्यामुळे सध्या याची जोरात चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे.

यावेळी The Vaccine War या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यावेळी पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जे या चित्रपटाचे पोस्टर आहे आणि सोबतच यावेळी या चित्रपटातून कोणकोणती स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे याचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातून नाना पाटेकर आणि अनुपम खेर एकत्र दिसणार आहेत. 

हेही वाचा : ऋषी सुनक सपत्नीक G20 साठी भारत दौऱ्यावर! नारायण मुर्तींच्या लेकीचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत

मागच्या वर्षी 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटानं मागच्या वर्षी बॉक्स ऑफिसवरून विक्रमी कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाची तेव्हा बरीच चर्चा होती. आता विवेक अग्निहोत्री हे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता ते  The Vaccine War या चित्रपटातून एक वेगळं सत्य समोर आणणार आहेत. त्यामुळे त्यांची आता जोरात चर्चा आहे. यावेळी या चित्रपटातून अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांच्या भुमिका दिसत आहेत. अभिनेत्री गिरिजा ओकही यावेळी या चित्रपटातून दिसते आहे. या पोस्टरखाली नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाखविली आहे. यावेळी नाना पाटेकरांना पाहूनही नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही एक बायो-सायन्स फिल्म आहे. यावेळी या चित्रपटातून नाना पाटेकर, रायमा सेन, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, साप्थमी गोवडा, निवेदिता भट्टाचार्य, अनुपम खेर, मोहन कपूर यांच्या भुमिका आहेत. हा चित्रपट covid-19 लसीकरणावर आधारित आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ही भारतातील पहिली बायो-सायन्स फिल्म आहे असं म्हटलं आहे. 

Read More