Marathi News> मनोरंजन
Advertisement

'द रॉक'ने ओळखला धोनीचा 'हॅलीकॉप्टर शॉट'

एकेकाळचा डब्लूडब्ल्यूई चॅम्पियन आमि सध्याचा हॉलीवूड स्टार 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉनसन भारतामध्ये चर्चेत आला आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. 

  'द रॉक'ने ओळखला धोनीचा 'हॅलीकॉप्टर शॉट'

नवी दिल्ली : एकेकाळचा डब्लूडब्ल्यूई चॅम्पियन आमि सध्याचा हॉलीवूड स्टार 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉनसन भारतामध्ये चर्चेत आला आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. 

व्हिडिओ ट्विट 

ड्वेनचा ”जुमानजीः वेलकम टू द जंगल” येत्या २९ डिसेंबरला थिएटरमध्ये येत आहे. या प्रमोशनसाठी तो सध्या भारतात आला आहे.

त्यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने ट्विट केला आहे. 

प्रमोशनसाठी भारतात 

सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याला क्रिकेटसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले, त्यातील बहुतांश उत्तरे त्याने चुकीची दिली. पण महेंद्रसिंग धोनीचा हॅलीकॉप्टर शॉट त्याने परफेक्ट ओळखला. 

धोनीची स्पेशालिटी  

हॅलिकॉप्टर शॉट धोनीची स्पेशालिटी आहे. असा शॉट मारणारा धोनी पहिला फलंदाज नसला तरीही धोनीने या शॉटला लोकप्रिय केले आहे. 

ड्वेनने यावेळी आपले क्रिकेट प्रेम जाहीर केले. 'इथल्या लोकांनी मला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले आहे, इथे माझे लाखो चाहते आहेत, मी सर्वांचा आभारी आहे असेही त्याने सांगितले. 

क्रिकेट असा एक रोमांचक खेळ आहे जिथे मी माझे नशीब आजमावू इच्छितो.'
 

Read More