Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कान्स'मध्ये झळकला "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस"

लवकरच "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र रिलीजआधीच या सिनेमाचा बोलबाला आहे. 

'कान्स'मध्ये झळकला

मुंबई : असे काही सिनेमा असतात. जे येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर कायम स्वरुपासाठी आपलं नाव कोरतात. असेच काही जुने सिनेमा आहेत जे आजही आणि आजच्या पिढीलाही कायम लक्षात आहेत आणि तितकेच लोकप्रियदेखील आहेत. याच यादीतला सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणजे शोले. हा सिनेमा असो किंवा मग या सिनेमातील गाणी असो किंवा मग यातील डायलॉग्स असो किंवा स्टारकास्ट असो. हा सिनेमा सगळ्याच बाजूने हिट ठरला होता. 

आता तुम्ही म्हणाल, या सिनेमा विषयी आम्ही आज का बोलत आहोत. तर यामागचं कारण म्हणजे गाजलेला हा सिनेमाचं कनेक्शन आता एका मराठी सिनेमासोबत असणार आहे. लवकरच "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र रिलीजआधीच या सिनेमाचा बोलबाला आहे. सध्या कान्स फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या कार्यक्रमाला अनेक कलाकार हजेरी लावत आहे. तर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली आहे. मात्र आता एका मराठी सिनेमाची कान्समुळे चर्चा आहे. हा सिनेमा दुसरा तिसरा नसून मराठी सिनेमा "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा आहे. 

हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील "शोले" हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ यांचा सत्कार स्वाती म्हसे I.A.S.MD महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटला मिळाला.

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.

Read More