Marathi News> मनोरंजन
Advertisement

'The Kashmir Files' सिनेमाची छप्परफाड कमाई; 100 कोटींचा गल्ला पार

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.

'The Kashmir Files' सिनेमाची छप्परफाड कमाई; 100 कोटींचा गल्ला पार

विवेक अग्निहोत्रींच्या 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाची जादू पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर पहायला मिळाली आहे. या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात जगभरात 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट प्रभासचा ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या बड्या सिनेमांवर फारच भारी पडला आहे.

7 दिवसांत कमावले 100 कोटी     

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी हे मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी सिनेमासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळाली होती. 

देशातील काही राज्यामध्ये विवेक अग्निहोत्रींचा हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. 

विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 15 कोटी इतक्या कमी बजेटमध्ये तयार केला आहे. 11 मार्च रोजी हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला होता. सिनेमा रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 3.55 कोटींची कमाई केली होती. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी या सिनेमाने 19 कोटींचा गल्ला जमवला आहे. यानुसार आठ दिवसांमध्ये 116 कोटी रूपयांचा आकडा पार केला. हा सिनेमा 125 कोटींपेक्षाही अधिक कमाई करण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read More