Marathi News> मनोरंजन
Advertisement

फॅमिली मॅन 2'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप म्हणाली...

फॅमिली मॅन 2'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : एकीकडे साऊथची प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री प्रियामणिच्या जबरदस्त अभिनयाबद्दल काही लोक तिची प्रशंसा करत आहे, तर काही लोक तिच्यावरही हास्यास्पद कमेंन्ट करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्रियामणिने लोकांना असं सांगितलं आहे की, 'सुचीसारखी बायको कोणालाही मिळू नये'. 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधील 'सुची' तिच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना म्हणाली, 'लोकं रील आणि खऱ्या आयुष्यातला फरक विसरतात. आणि हे ही विसरतात की, आम्ही फक्त आमचं काम करत आहोत'.

'द फॅमिली मॅन 2' मध्ये अभिनेत्री प्रियामणिने 'सुचित्रा अय्यर' ​​ही व्यक्तिरेखा साकारली आहे, ज्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी तिचा नवरा श्रीकांत तिवारीची भूमिका साकारत आहेत. एका मुलाखतीत प्रियामणि म्हणाली, 'माझा विश्वास आहे की, मी काहीतरी योग्य केलं आहे. आपण माझा तिरस्कार करू शकता. आताही मला असेही मॅसेज येत आहेत की, तुम्ही श्रीकांतसोबत असं करायला नको हवं होतं. मी माझ्या इंस्टाग्रामवर ज्या काही पोस्ट शेअर केल्या आहेत त्यावर निम्मे लोक अशाच कमेंन्ट करत आहेत. बरेच लोक मला हा संदेश पाठवतायेत की, 'देवाने एक भाकरी कमी द्यावी, पण तुझ्यासारखी बायकोला देऊ नये'.

ट्रोलर्सविषयी बोलताना प्रियामणि म्हणाली, 'मी प्रत्येकाला बसून हे समजवू शकत नाही की, बॉस, ही एक रील आहे. मी एक अभिनेत्री आहे. मी जे काही करत आहे ते माझे काम आहे. खऱ्या आयुष्यात मी तशी नाहीये. मला आश्चर्य वाटतं की, लोक येवढ्या पुढे का जातात? हे पहा, आपल्याला पात्र आवडलं नाही, हे आपलं मत आहे. पण भूमिका निभावत असणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही असं व्यक्तिशः घेण्याची गरज नाही आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

प्रियामणिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ही अभिनेत्री लवकरच तेलुगू अ‍ॅक्शन-ड्रामा 'नारप्पा' मध्ये दिसणार आहे. यात कार्तिक रत्नम आणि व्यंकटेश डग्गुबाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. श्रीकांत अदला दिग्दर्शित हा चित्रपट 20 जुलैला Amazonप्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

Read More