Marathi News> मनोरंजन
Advertisement

The Family Man 2: अभिनेता शरद केळकर आणि प्रियामणी यांच्यात लोणावळ्यामध्ये नेमकं घडलं तरी काय?

'द फॅमिली मॅन 2' ही वेब सिरीज आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट सिरीज मानली जाते. 

The Family Man 2: अभिनेता शरद केळकर आणि प्रियामणी यांच्यात लोणावळ्यामध्ये नेमकं घडलं तरी काय?

मुंबई : 'द फॅमिली मॅन 2' ही वेब सिरीज आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट सिरीज मानली जाते. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, प्रियामणी आणि सामन्था अक्किनेनी यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या सिरीजमध्ये शरद केळकरसारखे दमदार कलाकार आहेत. अलीकडेच शरद केळकरने इंस्टाग्रामवर प्रियामणीसोबत एक सेल्फी शेअर केला आहे.

शरद केळकरने हा फोटो शेअर करत एक विनोदही शेअर केला आहे. या फोटोत चेल्लम सरही त्यांच्यामागे दिसत आहेत. शरद केळकर सिरीजमध्ये अरविंदच्या भूमिकेत दिसला आहे. त्याचबरोबर प्रियामणीने सुचित्राची भूमिका साकारली आहे. चेल्लम सरांची भूमिका उदय महेशने साकारली आहे. फोटोत चेल्लम सरांनी हातात एक फोन धरला आहे आणि ते एका कोपर्‍यातून अरविंद-सुचित्राकडे पहात आहेत.

फोटो शेअर करत शरद केळकरने लिहिलंय की, "मला फोटो बॉम्बर्सचा तिरस्कार आहे पण चेल्लम सर मी तुझ्यावर प्रेम करतो." त्याचबरोबर चाहते या फोटोवर कमेंन्ट करत म्हणतायेत की, चेल्लम सर लोणावळ्यातील अरविंद आणि सुचित्रा यांच्यात काय घडलं ते सांगत आहेत. तर प्रियामणीने या पोस्टवर लाफ्टर इमोजी कमेंन्ट केल्या आहेत. 

चेल्लम सरांना सगळं काही माहिती आहे
काही चाहत्यांनी गंमतीत म्हटलं आहे की, चेल्लम सर लोणावाला सहलीचं रहस्य उलगडण्यास मदत करतील. एका चाहत्याने अशी कमेंन्ट केली की, "लोणावळ्यात काय घडलं हे देश जाणून घेऊ इच्छित आहे?" तर दुसरा चाहता म्हणाला, "म्हणूनच चेल्लम सरांना सर्व काही माहित आहे." तिसर्‍या चाहत्याने लिहिलं की, "ठीक आहे, चेल्लम सर देखील लोणावळ्यात!"

चेल्लम सर श्रीकांतला सांगतेय ही गोष्ट
शरद केळकरला एका चाहत्याने अशी कमेंन्ट करत म्हटलंय की, "चेल्लम सर श्रीकांत यांना सांगत आहेत की, तुम्ही लोणावळ्यात कोणत्या हॉटेलमध्ये होता."  तर दुसरा चाहता म्हणाला, "तर लोणावळ्यात काय घडलं हे फक्त चेल्लम सरांनाच माहित आहे.

Read More