Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनेक मेसेज करुनही 'या' अभिनेत्याकडून तापसीला उत्तर नाहीच....

पाहा तो अभिनेता आहे तरी कोण... 

अनेक मेसेज करुनही 'या' अभिनेत्याकडून तापसीला उत्तर नाहीच....

मुंबई : 'थप्पड' Thappad या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे, मुलाखतीही देत आहे. अशाच एका धमाल मुलाखतीत तापसीचा खेळकर अंदाज पाहायला मिळाला. 'स्कुपव्हूप अनस्क्रिप्टेड'ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने काही अशा गोष्टींचा उलगडा केला, ज्यामुळे सेलिब्रिटी वर्तुळातील अनेकजणांविषयीची कधीही समोर न आलेली माहिती समजता आली. 

तापसीच्या या मुलाखतीत तिने एका अशा अभिनेत्याचाही उल्लेख केला ज्याला खुद्द तापसी स्वत:हून मेसेज करते. ज्या अभिनेत्याचं नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. तापसीच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता म्हणजे 'आयर्न मॅन' अर्थात हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर. 

रॉबर्ट डाऊनीच्या अनोख्या अंदाचाचीच आपल्यावर भुरळ असल्याचं सांगत तो कोणत्याही रुपात आपल्याला तितकाच आवडत असल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं. 'बहुत सही है वो बंदा...', असं म्हणत तिने एक चाहती म्हणून त्याचं आपल्यासाठी असणारं महत्त्वं व्यक्त केलं. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

क्रश तर सर्वांचंच असतं असं म्हणत यात वावगं काहीच नाही हेसुद्धा तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं. 'मी त्याला खूप सारे डीएम (मेसेज) केले आहेत, पण त्याने एकाचंही उत्तर दिलेलं नाही', असं म्हणत एक छोटीशी खंतही तिने व्यक्त केली. आपल्या आवडत्या अभिनेत्याविषयी बोलतेवेळी सर्वसामान्य चाहत्यांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचे, कुतूहलाचे भाव असतात तेच भाव तापसीच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळाले. तेव्हा आता बॉलिवूडमध्ये यशाच्या वाटेवर निघालेल्या या अभिनेत्रीचं तिच्या 'क्रश'ला भेटण्याचं स्वप्न पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

Read More