Marathi News> मनोरंजन
Advertisement

Film Industry आज राहणार बंद; नाही होणार कोणत्याही सिनेमाची शुटिंग कारण...

फिल्म इंडस्ट्री एका दिवसासाठी देखील बंद ठेवणं... हा फार मोठा निर्णय आहे. मोठा निर्णय घेण्यामागचं कारण देखील फार मोठं आहे.  

Film Industry आज राहणार बंद; नाही होणार कोणत्याही सिनेमाची शुटिंग कारण...

Krishna Ghattamaneni Death: फिल्म इंडस्ट्री एका दिवसासाठी देखील बंद ठेवणं... हा फार मोठा निर्णय आहे. मोठा निर्णय घेण्यामागचं कारण देखील फार मोठं आहे.  तेलुगू सिनेविश्वाने एका प्रगल्भ अभिनेत्याला गमावलं (superstar krishna) आहे. म्हणून आज  तेलुगू इंडस्ट्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिग्गज अभिनेते कृष्णा घट्टमनेनी यांचं निधन (Krishna Ghattamaneni Death) झाल्यामुळे तेलुगू इंडस्ट्री आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णा घट्टमनेनी यांच्या निधनाने चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. (Telugu film industry will remain closed )

कृष्णा घट्टमनेनी यांच्या निधनानंतर सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. म्हणून तेलुगू चित्रपट निर्माते परिषदेने दिग्गज अभिनेत्याच्या सन्मानार्थ तेलुगू फिल्म इंडस्ट्री बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

तेलुगू फिल्म प्रोड्युसर्स काउंसिलने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून निर्णय जाहीर केला आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार, तेलगू फिल्म प्रोड्यूसर काउंसिलने निर्णय घेतला आहे की सुपरस्टार कृष्णाच्या सन्मानार्थ 16 नोव्हेंबर रोजी तेलुगू फिल्म इंडस्ट्री एक दिवसासाठी बंद राहिल. 

fallbacks

सुपरस्टार कृष्णा यांच्यावर अंत्यसंस्कार
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा यांचे पार्थिव हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियममध्ये ठेवण्यात येणार होतं. पण वाहतुकीचे निर्बंध लक्षात त्यांचं  पार्थिव नानकरामगुडा येथील निवासस्थानी ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. 

कृष्णा यांच्यावर 16 नोव्हेंबरला महाप्रस्थानम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर पूर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 महेश बाबूच्या आईच्या निधनानंतर वडिलांचं निधन 
काही दिवसांपूर्वी महेश बाबूच्या आई आणि कृष्णा (krishna actor wife) यांच्या पत्नी इंदिरा देवी यांचं निधन झालं. कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू 8 जानेवारी 2022 रोजी दीर्घ आजारामुळे निधन झालं. नंतर 28 सप्टेंबर रोजी इंदिरा देवी यांचे निधन झाले. (krishna mahesh babu father)

कृष्णा यांनी 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून ते यशस्वी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कायम सर्वांच्या लक्षात राहतील. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी आंध्र विद्यापीठातून डॉक्टरेटही पदवीही घेतली होती. (actor krishna sons and daughters)

Read More