Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nia Sharma चा हा 30 सेकंदाचा Video पाहून नेटकऱ्यांनी चक्क भूताशीच केली तुलना?

नुकतीच ती 'झलक दिखलाजा सीझन 10' च्या लाँचिंग पार्टीत पोहोचली होती.

Nia Sharma चा हा 30 सेकंदाचा Video पाहून नेटकऱ्यांनी चक्क भूताशीच केली तुलना?

Nia Sharma Bold video Viral : टेलिव्हिजनची सुपरबोल्ड अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती 'झलक दिखलाजा सीझन 10' (Jhalak Dikh La Ja) च्या लाँचिंग पार्टीत पोहोचली होती.

यादरम्यान ती इतके बोल्ड कपडे परिधान करताना दिसली की काही सेकंदातच तिनं शेअर केलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर पुरती आग लावली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निया शर्मा पुन्हा एकदा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये तिच्या किलर लुकमध्ये दिसली. 

नियानं ब्रासोबत टाईटी घातली होती. परंतु या लुकवर नेटकरी भडकले आणि म्हणाले की निया भूतासारखी दिसते आहे. काही नेटकऱ्यांना तिचा हा लुक आवडला नसून त्यांनी तिच्या लुकवरून तिला ट्रोल केलं आणि अत्यंत वाईट लूक कॅरी केला म्हणून तिची खिल्लीही उडवली. तर तिच्या काही चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षावही केला. 

30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये निया शर्मा असे कपडे परिधान करताना दिसली होती की तिचा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये निया शर्माने ब्लॅक कलरच्या ब्रासोबत शॉर्ट ब्लॅक कलरचा कोट घातला होता. 

निया शर्माचा 30 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नियाने बोल्ड ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि सगळे तिच्याकडे बघतच राहिले. या व्हिडिओमध्ये बिंदास निया देखील बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निया शर्माचा हा व्हिडिओ 'झलक दिखलाजा सीझन 10'च्या लाँचिंग पार्टीचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की निया शर्मा व्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक स्टार्स डान्स फ्लोरवर डान्स करताना दिसतील. 

'झलक दिखलाजा सीझन 10' कलर्स वाहिनीवर 3 सप्टेंबरपासून प्रसारित होत आहे.

Read More