Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसीरीज तुफान चर्चेत आहे. या सीरीजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हीरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यातील एका अभिनेत्रीने जी तवायफची भूमिका साकारली आहे ती खऱ्या आयुष्यातील तवायफची आहे. 

'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...

नेटफिक्सवर 1 मे रोजी रिजीज झालेली संजय लीला भन्साळी यांची हीरामंडीचं जगभरात खूप कौतुक होतंय. या सिरीजमधील प्रत्येक कलाकाराने साकारलेली भूमिका चाहत्यांना आवडली आहे. यात सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सेगल, अदिती राव हैदरी, ताहा शाह बलोच, रजत कौल, शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान आणि इंद्रेश मलिक यांनी काम केलंय. 

या सीरिजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमधील हीरामंडीतील तवायफचं आयुष्यावर प्राकश टाकण्यात आला. यातील मल्लिकाजनची भूमिका अदिती राव हैदरी हिने साकारली. ती एक तवायफ असून तिने ब्रिटीशांविरोधातील लढात आपलं योगदान दिल्याच यात दाखवण्यात आलं. हीरामंडीतील मल्लिकाजनची भूमिका ही खऱ्या आयुष्यातील प्रसिद्ध तवायफची आहे. 

fallbacks

ही तवायफ लाहोरची नाही तर...

भारत छोडो आंदोलनात 1920 मध्ये बनारसच्या एका तवायफने महात्मा गांधीजींना मदत केली होती. दक्षिण आफ्रिकेतून नुकतेच परतलेल्या महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी स्वराज निधी जमवण्याची मोहीम हातात घेतली होती. तेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत तवायफ गौहर जान यांनी मदत केली होती. झालं असं होतं की, या मोहीमेत पैसे जमा करण्यासाठी गौहर यांना मदत मागण्यात आली. तेव्हा त्यांनी आपण नृत्य करून पैसे जमा करु असं म्हटलं. पण त्यांनी एक अट ठेवली, जर गांधीजींना या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावं लागंल. 

fallbacks

गाधीजींनी अट...

स्वतंत्र लढात मदत म्हणून गौहर जान यांनी नृत्य केलं. पण गांधीजी त्या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यांनी मौलाना शौकत यांना तिथे पाठवलं. आपण सांगितलेली अट गांधीजींनी पाळली नाही म्हणून गौहर जान यांनी जमवलेल्या रक्कमेपैकी काहीच पैसे त्यांना दिले. या कार्यक्रमातून गौहर जान यांनी 24,000 जमावले होते. त्यातील 12,000  त्यांनी मौलाना शौकत यांना लढासाठी मदत निधी म्हणून दिले. 

fallbacks

पूर्वीच्या काळात तवायफला खूप मान दिला जात होता. आजही भारतातील 6 तवायफचं नाव आदराने घेतलं जातं. त्यातील एक नाव गौहर जान यांचं होतं. 19व्या शतकापर्यंत त्या गायनाच्या राणी होत्या. भारतातील पहिली रेकॉर्डिंग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती. 

गौहर जान यांचं खरं नाव काय?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, गौहर यांचं खरं नाव एंजेलिना योवर्ड होतं. त्या अर्मेनियन ज्यू होत्या. त्यांच्या वडिलांचं नाव रोबर्ट योवर्ड आणि आईचं नाव विक्टोरिया हेमिंग्स होतं. विक्टोरिया हेमिंग्स यांचा जन्म भारतात झाला होता. गौहर या रोबर्ट आणि विक्टोरियाचा एकुकता एक मुल होत्या. 

fallbacks

वयाच्या 6 व्या वर्षी गौहर यांचे आई वडील विभक्त झाले. गौहरच्या आईचं रोबर्टचा मित्र खुर्शीदसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे त्यांचे रोज भांडणं व्हायची. विभक्त झाल्यावर गौहरची आई विक्टोरिया यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांचं नाव मल्लिका जान आणि मुलीचं नाव गौहर जान झालं. 

वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार...

लेखक विक्रम संपत यांनी गौहर जानवर एक पुस्तक लिहिलंय. ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या सर्वच पैलूंवर लिखाण केलंय. माय नेम इज गौहर जान: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशियन असं त्या पुस्तकाचं नाव आहे. यात एक धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. जेव्हा गौहर जान 13 वर्षांच्या होत्या त्यांच्यासोबत बलात्कार झाला होता. या घटनेनंतर त्यांचे तुकडे तुकडे झाले होत. पण त्यांनी हिंमत न हरता वेदनांवर मात करत संगीत क्षेत्रात नावं कमावलं. 

fallbacks

गौहर जान यांनी 1887 मध्ये त्यांनी दरभंगाच्या राजासमोर नृत्य आणि गाण सादर केलं. राजाला गौहर यांची कला इतकी आवडली की त्यांनी गौहर यांना आपल्या राजघराण्यात स्थान प्रदान केलं. यानंतर गौहर बनारस आणि कलकत्ता आपलं आयुष्य व्यतित केलं. 

 

Read More