Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Tarzan' फेम हेमंत बिर्जे यांची मुलगी आहे खूपच बोल्ड; फोटो पाहून व्हाल थक्क

हेमंत बिर्जे 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' या चित्रपटातून रातोपात स्टार झाले.

'Tarzan' फेम हेमंत बिर्जे यांची मुलगी आहे खूपच बोल्ड; फोटो पाहून व्हाल थक्क

मुंबई : हेमंत बिर्जे 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' या चित्रपटातून रातोपात स्टार झाले. मात्र या चित्रपटानंतर ते अचानक कुठेतरी गायब झाले. हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पण सिनेमातील इंटिमेट सीन्समुळे ते बरेच चर्चेत राहिले. या चित्रपटात अभिनेत्री किमी काटकर मुख्य भूमिकेत दिसली होती.

हेमंत बिर्जे यांची मुलगी सोनिया बिर्जेही वडिलांप्रमाणेच स्टायलिश आहे. सोनियाचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हेमंत बिर्जे यांची मुलगी सोनिया बिर्जे आता मोठी झाली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ती सतत तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
हेमंत बिर्जे यांची मुलगी सोनिया सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरने लोकांना वेड लावते. ती अनेकदा बीचवरील फोटो शेअर करताना दिसते. जे लोकांना खूप आवडतात. या क्रमात, सोनियाचा एक ताजा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ती निळ्या आणि निऑन ग्रीन कलरमध्ये अतिशय स्टायलिश स्विमसूटमध्ये दिसत आहे. सोनियाचे मोकळे केस आणि तिचा किलर लूक पाहून लोक तिची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. या पोस्टवर लोकं आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेमंत बिर्जे यांची मुलगी सोनिया बिर्जे हिच्या फोटोवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं आहे की, 'बीच बेबी, फॉर अ चेंज', तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, 'उफ व्हॉट अ किलर अदा है'. इंडस्ट्रीला अलविदा केल्यानंतर हेमंत पुन्हा कधीच चर्चेत आले नाही. 2016 मध्ये हेमंत बिर्जे यांची आर्थिक स्थिती चांगली नसून ते बेघर झाल्याची बातमी आली होती.

Read More