Marathi News> मनोरंजन
Advertisement

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. 

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का?  बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर (Bhide Master) हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. परंतु त्यांच्यासोबतीनं त्यांच्या पत्नीची भुमिका करणाऱ्या माधवी भाभीही (Madhavi Bhabhi) सौंदर्यांच्या बाबतीत कुणाच्याही मागे नाहीत. छोट्या पडद्यावर त्या अगदी सुविद्य पत्नीचा रोल करत असल्या तरी खऱ्या आयुष्यात तर त्या खूपच ग्लॅमरस आहेत आणि भल्या भल्या अभिनेत्रींच्या पुढेही सुंदर दिसतात. त्यांच्या फोटोंची अनेकदा चर्चा होत असते. सध्या पुन्हा एकदा त्यांचे काही फोटोज हे व्हायरल होत आहेत. त्यात त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहून त्यांच्या चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. (tarak mehta ka ooltah chashma actor madhavi bhabhi glamorous photos goes viral)

माधवी भाभीची भुमिका साकारणाऱ्या साेनालिका जोशी (Sonalika Joshi) या सोशल मीडियावरही एक्टिव आहेत. अनेकदा त्या आपले फोटोजही सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. सध्या त्यांचे लेटेस्ट फोटोही व्हायरल होत आहेत. अनेकदा त्या त्यांचे सोशल मीडियावर व्हेशन फोटोजही (vacation) टाकत असतात. कधी वेस्टर्न लुकमध्ये तर कधी ट्रेडिशनल लुकमध्ये सोनालिका या इन्टाग्रामवर त्यांचे अनेक नानाविध फोटोज शेअर करत असतात. त्यांचे हे रूप त्यांच्या चाहत्यांनाही भावले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होतात फोटोज

त्यांच्या फोटोंना त्यांचे चाहते कायमच सकारात्मक प्रतिक्रिया देतात. सध्या त्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज शेअर करत आहेत. तारक मेहता मधील त्यांच्या भुमिकेला आजही लोकांनी स्मरणात ठेवले आहे. 

मध्यंतरी त्यांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात त्यात हातात बिडी ओढताना दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्यांच्या मालिकेतील रोल पाहून आणि हा व्हायरल होणारा फोटो पाहून सगळे चाहते आवाक झाले होते. त्यांचा हा असा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनाही बराच धक्का बसला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या मालिकेतून अनेक जूने कलाकार सोडून गेले होते आणि नवीन कलाकार येऊ लागले होते. परंतु प्रेक्षकांना मात्र जुन्या कलाकारांचाच अभिनय जास्त पसंद पडता होता. गेली मालिका गेली 14 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. 

Read More