Marathi News> मनोरंजन
Advertisement

काजोलचं बहिणीसोबत बिनसलं; एका लिपलॉक सीनमुळं नात्यात तणाव

Tanishaa Mukerji - Kajol : तनिषा मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. 

काजोलचं बहिणीसोबत बिनसलं; एका लिपलॉक सीनमुळं नात्यात तणाव

Tanishaa Mukerji - Kajol : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची मोठी लेक काजोल देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्या दोघींनंतर तनुजा यांची धाकटी लेक तनीषा मुखर्जीनं देखील बॉलिवूडमध्ये तिचं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण काजोलला जे यश मिळालं ते तिला मिळालं नाही. इतकंच नाही तर तनीषानं एक खुलासा केला की चित्रपटातं तिचं किसिंग सीन असल्यामुळे तिची बहीण काजोलनं तिचा चित्रपट पाहिला नाही. 

तनीषानं 2003 मध्ये मल्टी-स्टारर Sssshh या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2005 मध्ये यश राज फिल्म्स प्रोडक्शनच्या 'नील एन निक्की'मध्ये उदय चोप्रासोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत तनीषानं खुलासा केला की काजोलनं तिचा हा चित्रपट पाहिलाच नाहीच. तनीषानं यावेळी 'नील एन निक्की' मध्ये असलेल्या तिच्या या किसिंग सीनविषयी सांगितले होतं. तिनं म्हटलं होतं की चित्रपटात अनेक किसिंग सीन दाखवण्यात आले होतं. ज्यामुळे तिची बहीण काजोल आजही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत नाही. तर तिनं तिच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांना देखील सल्ला दिला की मोठं झाल्यावर चित्रपट पाहा. त्यासोबतच तिनं म्हटलं की जर आज जर तिला अशा चित्रपटाची ऑफर मिळाली तर ती यावर विचार करेल की याचा तरुणांवर काय परिणाम होईल. त्यावेळी तिनं याचा खोलवर विचार केला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तनीषाला तिच्या ऑनस्क्रीन किसिंग सीनवर विचारता ती म्हणाली की तो सीन ठिक होता, कारण ती आणि उदय चित्रपटाच्या शूटिंग आधीपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांच्या नात्याला सोपं केलं. असं वाटतं होतं की ती तिच्या बॉयफ्रेंडला किस करते. तनीषानं पुढे सांगितलं की तिची आणि उदयची पहिली भेट ही 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तिथे उदय त्याचा भाऊ आदित्य चोप्राला मदत करत होता तर तनीषा काजोलसोबत होती. 

हेही वाचा : मलायका अर्जुनचा ब्रेकअप? लग्नासाठी तयार नसल्यानं घेतला निर्णय!

तनीषाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'स्सशह', 'नील एन निक्की' याशिवाय 'एक दो तीन', 'अन्ना' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ती झलक दिखलाजा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये डान्स करताना दिसते. 

Read More