Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kiara Advani ची जुळी बहिण समोर; लवकरच करणार बॉलिवडमध्ये पदार्पण

'ही' तर हुबेहूब किआराची जुळी बहिण; फोटो पाहून तुम्हीही गोंधळाल...  एका मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी हुबेहूब किआरा सारखी दिसत आहे.
   

Kiara Advani ची जुळी बहिण समोर; लवकरच करणार बॉलिवडमध्ये पदार्पण

Kiara Advani : अभिनेत्री किआरा अडवणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल (Kiara Advani life style) आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. सध्या अभिनेत्री चर्चेत आली आहे, पण रंगणाऱ्या चर्चांमागे कारण चाहत्यांना हैराण करणारं आहे. एका मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी हुबेहूब किआरा सारखी दिसत आहे. किआरासारखी दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून राजकुमार संतोषी (rajkumar santoshi) यांची मुलगी तनीषा मुखर्जी (tanisha santoshi) आहे. 

तनीषाला पाहून चाहते गोंधळात पडले आहे. 'ही तर किआराची जुळी बहिणच आहे...' असं सोशल मीडिया युजर्स कमेंटमध्ये म्हणत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तनीषा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तनीषा सोशल मीडियावर कायम सक्रिय आसते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तनीषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. (Kiara-tanisha)

 

तनीषा कायम स्वतःचे हॉट आणि होल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तनीषाचे जवळपास 29.2 K पेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. तनीषाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनीषाच्या फोटोची चर्चा होत आहे. (tanisha santoshi age)

तनीषाला पाहून चाहत्यांना 'कबीर सिंग' मधील किआराची आठवण आली. तनीषा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी तनीषाने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल घोषणा केली. तेव्हा तनीषाने ब्लॅक एण्ड वाइट रंगाची साडी नेसली होती. तेव्हापासून तनीषाची तुलना किआरासोबत होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तनीषा आणि जान्हवी कपूरची मैत्री

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि तनीषा यांच्यात घट्ट मैत्री आहे. देघीही लहानपणापासून मैत्रिणी आहेत. दोघींचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तनीषा संतोषी वडील राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी वर्सेज गोडसे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Read More