Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्बूला कशी मुलं आवडतात? अजय देवगणनं केला मोठा खुलासा

अजय देवगणनं एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

तब्बूला कशी मुलं आवडतात? अजय देवगणनं केला मोठा खुलासा

मुंबई : सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikhhla Jaa 10) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचं सुत्रसंचालन मनीष पॉल करत आहे. तर नोरा फतेही (Nora Fatehi) , माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करण जोहर  (Karan Johar) हे शोचे परिक्षक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) यांनी हजेरी लावली होती. ते दोघेही त्यांचा आगामी चित्रपट दृश्यमच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. 

हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झाचे जुनं अफेर पुन्हा चर्चेत!

तब्बू आणि अजय देवगण हे खूप जुने आणि चांगले मित्र आहेत आणि दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्ड आहे. 'झलक'च्या मंचावर त्यांच्यातली मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. दोघेही एकमेकांना रोस्ट करत असल्याचे पाहायला मिळाले. प्रोमोमध्ये अजय आणि तब्बू समोरासमोर बसले आहेत. मनीष पॉल दोघांना एकमेकांबद्दल सिक्रेट्स सांगण्याचे टास्क देतो. (Tabu likes This Type Of Boys Ajay Devgan made fun of actress Drishyam) 

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनीषने अजयला विचारले की, तब्बूला तिच्या बॉयफ्रेंडमध्ये कोणता गुण हवा आहे. अजयने उत्तरात लिहिले, 'टक्कले मुलं.' यानंतर अजय म्हणतो, 'मला माहित आहे की ती हे नाकारेल, पण हे सत्य आहे.' तब्बू त्याला आधीच म्हणाली होती की, जर तिला भीती वाटते आणि बोलते की तू सगळ्यांसमोर सत्य सांगू नको. मात्र, अजयनं हे सांगितल्यानंतर तब्बू त्याला खडू फेकून त्याला मारते.यानंतर मनीष तब्बूला विचारतो की, 'कॉलेजच्या काळात अजयचं क्रश कोण होत? यावर तब्बूनं लिहिलं की, 'तो कधीच कॉलेजला गेला नाही.' दोघं एकमेकांना रोस्ट करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

तब्बू आणि अजय त्यांचा आगामी चित्रपट 'दृश्यम 2' (Drishyam 2) मध्ये एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय खन्ना आणि इशिता दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Read More