Marathi News> मनोरंजन
Advertisement

TMKOC : 'आता साक्षीदारच विकत घेतला' जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोपz

Taarak mehta ka ooltah chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रिनं निर्माता असित मोदींवर केलेले आरोप आहे. आता पुन्हा एकदा जेनिफरनं आणखी आरोप केले आहेत. 

TMKOC : 'आता साक्षीदारच विकत घेतला' जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोपz

Taarak mehta ka ooltah chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. तर ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ही मालिका चर्चेत असण्याचं कारण अभिनेत्री जेनिफर मिस्त्री आहे. जेनिफरनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे निर्माता असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे ही संपूर्ण मालिका चर्चेत आली होती. इतकंच नाही तर जेनिफरनं त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जेनिफरनं खुलासा केला की असित मोदी यांनी तिच्या बाजूनं साक्षी देणाऱ्या व्यक्तीला त्यांनी पैसे दिले आहेत त्यामुळे आता ती व्यक्ती काही बोलेल यावर ती काही बोलू शकत नाही. 

असित मोदी यांच्या प्रकरणात जेनिफरच्या बाजूनं साक्ष देण्यासाठी तिचा सह कलाकार गुरुचरण सिंह सोढी होता. पण आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही बातमी समोर आली आहे की त्याचं नाव तिनं घेतल्यानंतर असित मोदी यांनी त्याचे तीन वर्षांपासून अडकलेले म्हणजेच उर्वरीत पैसे परत केले. असित कुमार मोदी यांच्या ऑफिसमधून 8 जूनला गुरुचरणला फोन आला आणि त्याचे तीन वर्षांचे अडकलेले पैसे देण्यात आले. त्यानंतर गुरुचरणचा मला अचानक 9 जून रोजी फोन आला. सिंगापुरमध्ये असित मोदी हे माझ्यासोबत ज्या प्रकारे चुकीचे वागले होते आणि त्यावेळी गुरुचरण यानेच मला वाचवले होते. गुरुचरण हे माझ्या आणि असित यांच्या मध्ये येऊन थांबला होता. जेणेकरून असित मला हाथ लावू शकणार नाहीत. कारण मी त्याला आधीच असित मोदीच्या स्वभावाविषयी सांगितले होते., 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : पक्षाची मेलेली पिल्लं, स्मशानात घेऊन जाणारी व्यक्ती अन्...; नर्गिस फाखरीनं सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

पुढे जेनिफर म्हणाली, 'माझ्या केसमध्ये तो एक महत्वाची साक्ष देणार होता. मात्र, असित कुमार मोदीने त्याला पैसे देत आता सगळं विस्कटून टाकलं आहे. त्यानं मला फोन करून सांगितलं होतं की तो नक्कीच माझ्यासाठी साक्ष देईल. पण तो इतक्यात मीडियासमोर कोणतीही कमेंट करणार नाही, पण कोर्टात नक्कीच मला पाठिंबा देतील. पण त्याला असित मोदीच्या ऑफिसमध्ये बोलावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो आता माझ्याबाजून बोलणार नाही. तो माझ्यात आणि असित मोदीमध्ये न्युट्रल राहणार.' दरम्यान, असित मोदी यांच्यावर प्रिया आहुजा हिने देखील गंभीर आरोप हे केले आहेत.

Read More