Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तारक मेहता...'मधील भिडे मास्तर यांच्या लेकीचा सिझलिंग बिकिनी लूक :VIDEO

बिकिनी लूकमध्ये पाहून सगळेच हैराण

'तारक मेहता...'मधील भिडे मास्तर यांच्या लेकीचा सिझलिंग बिकिनी लूक :VIDEO

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील गोकूळ धाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे गुरुजी यांची सोनू भिडे (Sonu Bhide)तुम्हाला लक्षात आहे? आता शोमध्ये निधी भानुशाली या अगोदच्या सोनूची भूमिका साकारत होती. आता ती सोनूची भूमिका साकारत नाही. तरी देखील ती आजही चर्चेत आहे. त्याला कारण आहे तिचे बोल्ड फोटो. ही सोनू भिडे (निधी भानुशाली) तारक मेहता...'मधील भिडे मास्तर यांची सिरियलमध्ये लेक आहे. या भिडे मास्तरना, जेठालाल मालिकेत भिडे गुरुजी, भिडू असंही म्हणतात...त्याचं मालिकेतील नाव आत्माराम भिडे असंही आहे.

2021 वर्षाच्या सरत्याकाळात निधीने बोल्ड बिकिनी लूक शेअर केला आहे. एक व्हिडीओ पोस्ट केला असून Glimpse of 2021 अशी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने आभार मानले आहेत. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालाल मालिका सोडणार?) 

 

2021 चा आतापर्यंतचा प्रवास 

'तारक मेहता...' सोनू भिडे म्हणजे निधी भानुशाली आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने 2021 मध्ये काय काय केलं तो प्रवास या व्हिडीओतून दाखवला आहे. या व्हिडीओत सुरूवातीलाच ती बिकिनी घालून नदीत पोहताना दिसत आहे. त्यानंतरचा तिचा सगळा प्रवास या व्हिडीओत दिसत आहे.  (टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर 'तारक मेहता' फेम बबीताकडून प्रेमाची कबुली?) 

का आहे निधीकरता 2021 हे वर्ष खास 

2021 हे निधीकरता खास आहे. त्यामागचं कारण 'या वर्षाने मला खूप काही दिलं. हे समजणं कठिण आहे. माझा पहिली सिनेमा, पहिली कार, पहिला कॅमेरा, बराच काळ घरापासून दूर राहणं, पहिल्यांदा कुत्रा चावला, पहिल्यांदाच अनेक गोष्टी मी यावर्षी केलं आहे. सगळ्यासाठी आभार... '

कमेंट करून चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

निधीच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ सुरू आहे. 

Read More