Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : तापसी पन्नूच्या 'गेम ओवर'चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाचा ट्रेलर अतिशय थरारक आणि खिळवून ठेवणारा आहे. 

 

VIDEO : तापसी पन्नूच्या 'गेम ओवर'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या प्रत्येक चित्रपटात काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या अदा ग्लॅमरसहून थोड्या वेगळ्या आहेत. परंतु चित्रपटाच्या आशयाच्या बाबतीत मात्र तापसीचे चित्रपट कमाल करतात. तापसीच्या आगामी 'गेम ओवर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'गेम ओवर'चा ट्रेलर हॉरर-थ्रिलर असून चित्रपटात दिल्ली, एनसीआरमधील एक घटना दाखवण्यात आली आहे. 

चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप, वाय नॉट स्टूडिओ आणि रिलायन्स एन्टटेनमेंट यांनी एकत्रित केली आहे. अश्विन सरवनन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर तापसीने तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. 

चित्रपटात तापसीसोबत असं काही झालं आहे की, तिला अंधाराची भीती वाटते. तापसी तिच्या या समस्येमुळे डॉक्टरांच्याही संपर्कात आहे. तापसीच्या घरी मोलकरीणही असल्यांचं दिसतंय. त्यातचं एक खूनी मुलींना मारून त्यांना जाळून टाकतो अशी बातमी येते आणि हाच चित्रपटाच्या कथेचा ट्विस्ट आहे. ट्रेलरमध्ये तापसी गेम खेळतानाही दिसतेय, याचादेखील कथेशी संबंध आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय थरारक आणि खिळवून ठेवणारा आहे. 

'गेम ओवर' तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'गेम ओवर' हिंदीसह राणा दुग्गाबाती आणि अभिनेता धनुष यांनी तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित केला आहे. 

Read More