Marathi News> मनोरंजन
Advertisement

Swara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट

Swara Bhaskar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत...

Swara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट

Swara Bhaskar With Mystery Man : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. स्वरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. स्वरानं नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. स्वराच्या पोस्टवरून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की पुन्हा एकदा स्वरा प्रेमात अडकली आहे की काय? स्वरानं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. (Swara Bhaskar Viral Photo) 

स्वरानं शनिवारी रात्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी एका मिस्ट्री मॅनसोबत स्वरा दिसली आहे. स्वरानं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या दोघांचा चेहरा दिसत नाही. मात्र, तिनं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करत स्वरा म्हणाली, 'हे प्रेम असू शकतं.' स्वराची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव सुरु केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, बॉयफ्रेंड आहे का? तर दुसरा नेटकरी म्हणाला, फोटोत तुझ्यासोबत कोण आहे? तिसरा नेटकरी म्हणाला, तुझे खूप खूप अभिनंदन. तर अभिनेत्री अपूर्वा सोनीनं स्वराच्या या पोस्टवर कमेंट करत 'मुली तुझे अभिनंदन'. (Swara Bhaskar With Mystery Man)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, याआधी स्वरा भास्कर लेखक हिमांशू शर्मासोबत (Himanshu Sharma) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. स्वरा भास्कर ही हिमांशू 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, 2019 मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. स्वराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर स्वरा गेल्या वर्षी 'जहां चार यार' चित्रपटात शेवटची दिसली होती. ती लवकरच 'मिमांसा' या मर्डर मिस्ट्री चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय 'मिसेस फलानी'ही त्यांच्या हाती आहे. कमल पांडे दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.(Swara Bhaskar Relationship With Himnshu Sharma) 

स्वरानं काही दिवसांपूर्वी कास्टिंग काऊचचा आलेला तिचा अनुभव सांगितला होता. 

आपल्या स्टाईल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. पहिल्यांदा एखाद्या निर्मात्याने तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले आणि दुसऱ्यांदा निर्मात्याच्या व्यवस्थापकाने केले,असा खुलासा स्वरानं केला. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा भास्करने सांगितले की, एक फिल्ममेकर तिच्या मागे होत्र. तो तिला सतत फॉलो करत होता आणि कॉल करत होता. 

हेही वाचा : Urfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'

'इंडियन एक्सप्रेस'च्या एका कार्यक्रमात स्वरा भास्करने दुसऱ्या घटनेचा उल्लेख केला. 'तिला एका निर्मात्याच्या मॅनेजरला भेटायचे होते. ती मॅनेजरला भेटली आणि बोलत असताना तो स्वरा जवळ आला आणि तिच्या कानाजवळ किस करण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि आय लव्ह यू बेबी म्हणू लागला. अचानक घडलेल्या या घटनेने स्वराला धक्का बसला आणि तिने मॅनेजरला हाकलून दिले.

Read More