Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या 34 व्या वर्षीही Swara Bhaskar मिठाई-पराठे खाऊन कशी काय इतकी फीट?

Swara Bhaskar Diet: अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar Marriage) नुकतेच आपलं समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्या लग्न केले आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांची कायमच चर्चा होती. सतत चर्चेत असलेली स्वरा भास्कर आपलं डाएट कसं फॉलो करते. 

वयाच्या 34 व्या वर्षीही Swara Bhaskar मिठाई-पराठे खाऊन कशी काय इतकी फीट?

Swara Bhaskar Marriage : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं समाजवादी पार्टीच्या युवा नेत्याशी (Swara Bhaskar Fahad Khan) 6 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली आहे. कुठलाही न सांगता सवरता आणि आपल्या चाहत्यांना त्याची अजिबातच भनक लागू न देता स्वरानं आपला प्रियकर फहादशी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आता स्वरा भास्कर चांगलीच चर्चेत आली आहे. सगळीकडेच तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तिच्या लग्नाचे फोटोजही सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. तिनं शेअर केलेल्या इन्टाग्राम पोस्टवर (Swara Bhaskar Instagram Post) तिच्या अनेक चाहत्यांनी कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्टाग्राम व्हिडीओतून (Swara Bhaskar Diet) तिनं आपले लग्न फहान अहमदशी संपन्न झाल्याचे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. आपला पहिला बॉयफ्रेंड हिमांशू शर्मा याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर एका मुलासोबत तिनं आपला फोटो इन्टाग्रामवर शेअर केला होता. फहाद अहमद असं स्वरा भास्करच्या नवऱ्याचे नाव आहे. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली स्वरा भास्कर आता कायमचीच लग्नबंधनात अडकली आहे. सध्या स्वरा भास्कर विषयीच्या चर्चा रंगल्या आहेत.  

बॉलिवू़डमध्येही स्वरा भास्कर हिनं आपलं असं वेगळं नावं प्रस्थापित केले आहे. ग्लॅमरच्या बाबतीतही स्वरा कशातच कमी नाही. तिही इतरांप्रमाणे डाएट आणि फिटनेस फॉलो करते त्यामुळे तिच्याकडे आता ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. तुम्हाला माहितीये का स्वरा भास्कर नक्की कोणते आणि कसे डाएट फॉलो करते? 

  1. वयाच्या 34 व्या वर्षीही स्वरा खूप जास्त फीट आणि निरोगी आयुष्य जगते आहे. त्यामुळे तिच्या डाएट आणि फिटनेसविषयी सगळ्यांनाच आकर्षण आहे. मध्यंतरी तिनं दिलेल्या एका मुलाखतीतून आपल्या डाएट आणि वर्कआऊटबद्दल खुलासा केला होता. 
  2. तिनं एक मुलाखतीत सांगितले होते की ती किटो डाएट फॉलो करते. तिच्या या किटो डाएटमध्ये कार्बज फार कमी असतात तेव्हा त्यामुळे शरीरात कीटोन्स तयार होतात. यानं तुमचे फॅट्स बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. स्वराला घरगुती जेवण जास्त पसंद आहे. ती हाय फायबर आणि हाय प्रोटीन (High Protein) असेलल्या भाज्या खाते. 
  3. अनेक ती आपल्या जेवणात पराठे आणि मिठाई खाणंही तितकंच पसंद करते. तिचे अनेकदा अश्या डीशेसेससोबतच फोटोही व्हायरल झाले आहेत. 
  4. आपल्या बॉडीला कायम हायड्रेट ठेवण्यावर स्वरा भर देते. त्यामुळे नियमित पाणी आणि नारळाचे पाणी तिच्या डाएटमध्ये असते. 
  5. ती आपल्या वर्कआऊटमध्येही कार्डिओ, इंटेंसिटी ट्रेनिंग आणि इतर एक्सरसाईजवर भर देते. त्याचसोबत एब्स ट्रेनिंगही करते. 
Read More